अनेक आजारांनी त्रस्त असणाऱ्या लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक!

135

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्रीलालू प्रसाद यादव यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली आहे. त्याच्यावर रिम्सच्या पेइंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. लालू यादव यांची किडनी सातत्याने खराब होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या प्रकरणात डायलिसिस आवश्यक आहे. लालू यादव यांची किडनी 80 टक्क्यांहून अधिक खराब झाली आहे. कोणतीही सुधारणा दिसून येत नाही. मिळालेल्या अहवालानुसार, औषधांच्या डोसमध्ये आणि त्यांच्या आहारामध्ये बदल केले जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

या आजारांनी ग्रासले लालू प्रसाद यांना… 

लालू यादव यांना अनेक आजारांनी ग्रासले आहेत. मधुमेह, रक्तदाब, किडनी, दातांची समस्या अशा अनेक आजारांचा सामना त्यांना करावा लागत असून त्यांच्यावर रिम्समधील डॉक्टर सातत्याने उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या दातावर रूट कॅनाल ट्रीटमेंट करण्यात आली होती. लालू प्रसाद यादव दीर्घकाळापासून अनेक आजारांनी त्रस्त आहेत, त्या आधारावर जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणी झाल्यानंतर 11 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. चारा घोटाळा प्रकरणात त्यांना पाच वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदी गृहराज्य गुजरातच्या दौऱ्यावर! काय आहे कारण?)

यादव यांना किडनीची समस्या

दरम्यान,  मंगळवारी लालू प्रसाद यादव यांच्या सीरम क्रिएटिन लेव्हलची तपासणी करण्यात आली, जी 3.5 वरून 4.2 झाली. किडनीची कार्य करण्याची क्षमता सीरम क्रिएटिनिनद्वारे दिसून येते. किडनीची स्थिती अशीच राहिल्यास लालू प्रसाद यादव यांना लवकरच डायलिसिस करावे लागू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.