घाटकोपर येथील असल्फा व्हीलेज या भागात ग्रीन झोन म्हणून आरक्षित असलेल्या ३ हजार चौ.फू. भुखंडावर बेकायदा मशीद उभारण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणी स्थानिक हिंदूंमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मागील दोन वर्षांपासून येथील हिंदू धर्मीय या बांधकामाच्या विरोधात लढा देत आहेत, रविवार, १५ जानेवारी रोजी अखेर स्थानिक हिंदू धर्मीय रहिवाशांनी या ठिकाणी जोरदार निदर्शने केली. त्यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे या आंदोलनात सहभागी झाले होते.
लॉकडाऊनच्या काळात मशिदीचे बांधकाम सुरु
लॉकडाऊनच्या काळात या ठिकाणी मशिदीचे बांधकाम सुरु करण्यात आले होते, त्यावेळी स्थानिक हिंदूंनी याला विरोध केला होता, महापालिकाकडे तक्रार केली होती. महापालिकेने त्या बांधकामाला अनधिकृत ठरवून कारवाईची नोटीस दिली. परंतु मुसलमानांनी न्यायालयात जाऊन त्यावर स्थगिती आणली. त्यामुळे आता स्थानिक हिंदू समाज आता रस्त्यावर उतरले. त्यांनी रविवारी, १५ जानेवारी रोजी मोठा मोर्चा काढला. भाजपचे आमदार नितेश राणे या आंदोलनात सहभागी झाले होते.
(हेही वाचा महाराष्ट्र केसरी पहिला टप्पा ऑलिम्पिक ध्येय ठेवा; शरद पवारांचे महाराष्ट्र केसरी विजेत्याला आवाहन)
Join Our WhatsApp Community