भूमीहीनांना जागा खरेदी करताना मिळणार विशेष सवलत

140

ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील पात्र, परंतु भूमीहीन लाभार्थींना जागा देण्यासंदर्भात बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या योजनेतील लाभार्थ्यांना जागा खरेदी करताना पंतप्रधाम आवास योजना- शहरीच्या धर्तीवर १ हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क रक्कम निश्चित करण्यात येईल. लाभार्थींनी खरेदी केलेल्या जागेकरिता मोजणी शुल्कामध्ये ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे.

( हेही वाचा : रातोरात झाले बेरोजगार, पिंपरी-चिंचवडमध्ये शंभराहून अधिक कामगारांवर बेकारीची कु-हाड)

५०० चौ. फूट कृषी जमीन खरेदी करताना तुकडे बंदी कायद्यातील अट लागू होणार नाही, अशी अधिनियमात सुधारणा करण्यात येईल. लाभार्थींना २ मजली ऐवजी ४ मजली इमारत बांधण्यास मान्यता देण्यात येईल. गायरान जागा लाभार्थींना भाडेपट्टयाने देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. दरम्यान, ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थींनी शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांकडे सादर करून ९० दिवसाच्या आत मान्यता देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.