हिंदू शेतकरी आणि हिंदू देवस्थानच्या जमिनी परत करणार; महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांची घोषणा

99
हिंदू शेतकरी आणि हिंदू देवस्थानच्या जमिनी परत करणार; महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांची घोषणा
हिंदू शेतकरी आणि हिंदू देवस्थानच्या जमिनी परत करणार; महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांची घोषणा

Chandrashekhar Bawankule : लोकसभेत वक्फ दुरूस्ती विधेयक (Waqf Amendment Bill) मांडल्यानंतर महाराष्ट्रात मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. “संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर, त्यातील तरतूदी पाहून वक्फ बोर्डाने बेकायदेशीरपणे बळकावलेल्या (illegally acquired land by Waqf Board) किंवा अतिक्रमण केलेल्या हिंदू शेतकरी आणि देवस्थानच्या जमिनी, तसेच काही मुस्लिम जनतेच्या जमिनी परत करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी म्हटले आहे. (Chandrashekhar Bawankule)

(हेही वाचा – Kunal Kamra ला पोलिसांनी बजावले तिसरे समन्स !)

माध्यमांसमोर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी आपल्याला दाव्याने सांगतो की, संसदेमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याच्यात काय काय तरतुदी मंजूर झाल्या ते पाहण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्र सरकार देखील पुढाकार घेऊन हिंदू शेतकऱ्यांच्या, हिंदू मंदिरांच्या आणि संस्थानाच्या तसेच मुस्लिम समाजाच्या देखील ज्या जमिनी वक्फ बोर्डाने मोगलाई करुन बळजबरीने ताब्यात घेतल्या आहेत. त्या परत करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे महाराष्ट्र सरकार नक्कीच पुढाकार घेईल, ज्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आल्या आहेत, त्या परत केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – वक्फ सुधारणा विधेयकावरून Chitra Wagh यांचा राऊतांना टोला; म्हणाल्या, मातोश्रीवर वक्फ बोर्डाची…)

वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत सादर
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Minister Kiren Rijiju) यांनी बुधवारी ०२ एप्रिलला लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले. वक्फ विधेयकाद्वारे सरकार कोणत्याही धर्माच्या बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. हे विधेयक केवळ मालमत्तेच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे. मंदिर, मशीद किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनाशी त्याचा काहीही संबंध नाही, असे मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत आपल्या भाषणात स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.