नवी मुंबईतील विमानतळाच्या नजीक उभा राहिला मोठा बेकायदेशीर Dargah; कारवाईची मागणी

185

सिडकोच्या अंतर्गत येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धोकादायक जवळ बेकायदेशीरपणे उभारलेल्या दर्ग्यावर (Dargah) त्वरित कारवाईची मागणी करावी, या संदर्भात 2023 साली सिडकोला एक पत्र लिहून आणि आंदोलनाच्या माध्यमातून योग्य ती कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले होते, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही, असे पत्र हिंदू जनजागृती समितीने सिडकोला दिले.

(हेही वाचा मविआला Samajwadi Party चा अल्टिमेटम; ५ जागा द्या, नाहीतर…)

विमानतळाच्या सुरक्षिततेस गंभीर धोका

या बेकायदेशीर बांधकामांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, कारण हे अतिक्रमण विमानतळाच्या धावपट्टीजवळ आहे. सुरक्षा आणि सार्वजनिक हितासाठी हे बांधकाम त्वरित हटविणे अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात, नियोजन संस्था सिडकोने पूर्वीच नोटीस बजावली असल्याची बातमी समोर आली होती, परंतु प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही. विशेषतः 2012 मध्ये काही दगडांपासून सुरु झालेली मजार हळूहळू विस्तारत एक एकर क्षेत्र व्यापत आहे. हे अतिक्रमण आता दर्ग्याचे (Dargah) रूप धारण करून मोठ्या प्रमाणात बांधकामासह इतर सुविधांसह उभे राहिले आहे. या गोष्टींमुळे विमानतळाच्या सुरक्षिततेस गंभीर धोका आहे. बेकायदेशीर दर्गे (Dargah), मजार, आणि अन्य बांधकामे हटविण्याची मागणी करत असताना, प्रशासन कायदा- सुव्यवस्थेच्या मुद्यांचा आधार घेत निष्क्रिय राहत असल्याचे अनेक वेळा दिसून येते. परंतु हे धोरण राष्ट्रीय सुरक्षेला आणि सार्वजनिक हिताला धोका पोहचवणारे आहे. आमची प्रामाणिक मागणी आहे की यापुढे विलंब न करता, या बेकायदेशीर बांधकामांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, असे हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.