Maharashtra budget 2022 : ‘लालपरी’ला पुन्हा जीवंत करण्याचा निर्धार

142

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटलेला नाही. सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आणि यासोबतच न्यायालयीन सुनावणीनंतर देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा कायम आहे. लालपरीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं, या मागणीवर संपकरी एसटी कर्मचारी ठाम असल्यामुळे संप अजूनही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये एसटी महामंडळासाठी विशेष आर्थिक तरतूद जाहीर करून ‘लालपरी’ला पुन्हा जीवंत करण्याचा निर्धार केल्याचे दिसतेय.

(हेही वाचा – Maharashtra budget 2022 : लता मंगेशकर संगीत महाविद्यालयासाठी १०० कोटींची तरतूद)

अर्थसंकल्पात अशा आहेत एसटी कर्मचाऱ्यांसाठी तरतूदी

राज्याच्या अर्थसंकल्पीय अर्थसंकल्पात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार १०७ कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा अजित पवारांनी केली.

  • महामंडळाला तब्बल ३ हजार नव्या पर्यावरणपूरक बसगाड्या उपलब्ध होणार
  • बसस्थानकांचा दर्जा सुधारण्यासाठी, त्यांच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसाहाय्य उपलब्ध होणार
  • परिवहन विभागासाठी ३,००३ कोटींची तरतूद
  • एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी ४ हजार १०७ कोटींची तरतूद
  •  विद्युत वाहनांची संख्या वाढवण्याचा देखील प्रस्ताव
  • राज्यातील वाहतूक व्यवस्थेसंदर्भात देखील विविध उपाययोजनांसाठी तरतूद
  • २०२५ सालापर्यंत महाराष्ट्रात विद्युत वाहनांसाठी ५ हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्धार

महाराष्ट्रातील नागरिकांना सुखद धक्का  

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असेही सांगितले की, युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा जगावर परिणाम होईल. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महागाई वाढणार असल्याचे संकेत दिले आहे, असा उल्लेख करूनही त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना सुखद धक्का दिला. सीएनजीवरील मूल्यवर्धित कर साडेतेरा टक्क्यांवरून तीन टक्के करायचा प्रस्ताव यावेळी मांडला. या निर्णयामुळे सरकारचा ८०० कोटींचा महसूल बुडेल. मात्र, सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.