पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण आणि अभिवादन केले. ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “लता दीदींचे त्यांच्या जयंतीदिनी स्मरण. अनेक आठवणी मनात रुंजी घालत आहेत. असंख्य वेळा संवाद साधताना त्यांनी आपुलकीचा वर्षाव केला आहे. मला आनंद होत आहे की, अयोध्येतील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात येत आहे. भारतातील सर्वश्रेष्ठ गायिकेला दिलेली ही सुयोग्य श्रद्धांजली.”
दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर आणि नरेंद्र मोदींचे फार जुने अनुबंध होते. स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या समर्थक, चाहत्या होत्या. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान होण्यापूर्वी अनेक वेळा अनेक ठिकाणी त्यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वास मान्यता दिली होती.
Remembering Lata Didi on her birth anniversary. There is so much that I recall…the innumerable interactions in which she would shower so much affection. I am glad that today, a Chowk in Ayodhya will be named after her. It is a fitting tribute to one of the greatest Indian icons.
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2022
( हेही वाचा: पीएफआय संघटनेवरील बंदीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वागत )
6 फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 8 जानेवारी रोजी कोरोना संसर्गाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. तसेच, त्यांच्याप्रती आदर म्हणून दोन दिवस राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community