गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाल्यावर त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राजकीय आणि कला क्षेत्रातील अनेक दिग्गज लता ताईंना श्रद्धांजली देण्यासाठी जमले होते, त्यामधे अभिनेता शाहरूख खान त्यांच्या श्रद्धांजली देण्याच्या पद्धतीवरून वादात सापडला आहे, तो लता दीदींच्या पार्थिवावर थुंकला, असा समज निर्माण झाला आणि काही क्षणात शाहरूख खान ट्रोल झाला आहे.
व्हिडिओमध्ये दिसला शाहरूख
लता दीदींना अग्नी देण्याआधी त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथे अंत्य दर्शनासाठी ठेवले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील आणि चित्रपट सृष्टीतील दिग्गज मंडळी यांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली. ज्यावेळी शाहरूख खान हा व्यासपीठावर चढून लता दीदींच्या पार्थिवासमोर उभा राहिला. त्यावेळी त्याने मुस्लिम रीती रिवाजाप्रमाणे दोन्ही हातांची ओंजळ करून दुवा मागितली, तोवर शाहरुखच्या तोंडावर मास्क होता, शेवटी त्याने मास्क काढून थंकल्या सारखे वर्तन केले, त्यामुळे समाजमाध्यामात त्याच्या या कृतीचा निषेध होवू लागला आहे.
लता मंगेशकर जी को श्रद्धांजली देने आया हकला खान उसके पार्थिव शरीर पर कुछ बुदबुदाकर थूकते हुए रिकोर्ड हुया । #LataMangeshkarPassesAway #LataMangeshkar #HaklaKhan pic.twitter.com/9W67t79lTL
— 🇮🇳Pradeep katiyar सनातनी 🇮🇳 (@Pradeep02231917) February 6, 2022
— भसम (@TrishulSangathn) February 6, 2022
थुंकला नाही तर हवेत फुंकर मारली?
दरम्यान जसे शाहरुखच्या या कृत्यावर सोशल मीडियातून टीकाटिप्पणी होवू लागली, तेव्हा मुसलमानांनी शाहरुखची बाजू मांडण्याचा जोरदार प्रयत्न केला. शाहरूख थुंकला नसून त्याने हवेत फुंकर मारून दुवा मागितली आहे, हा मुस्लिमांमध्ये एक प्रकारचा रिवाज आहे, असे मुसलमान सांगत आहेत. मात्र कोरोना काळात असे करणे योग्य आहे का, असा प्रतिप्रश्न नेटकरी विचारू लागले आहेत.
https://twitter.com/SidrahDP/status/1490338361260740609?t=N25GtU7wXAKuqG0Nvm9xqg&s=19
Join Our WhatsApp Community