सध्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) हे चर्चेत आले आहे. गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार केल्यानंतर, या मैदानातच त्यांचे स्मृतीस्थळ उभारण्याची मागणी करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर माणसे नेते संदीप देशपांडे यांनी जे ट्विट केले आहे, त्यावरून आता लता दीदींच्या स्मृतीस्थळाबाबत मनसेची भूमिका नक्की काय आहे, याविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे.
काय केले आहे संदीप देशपांडे यांनी ट्विट?
संदीप देशपांडे यांचे ट्विट ही मनसेची भूमिका असते, असे सर्वसाधारण समजले जाते. त्यामुळे शिवाजी पार्कसंबंधी त्यांनी केलेले ट्विट आता चर्चेत आले आहे. संदीप देशपांडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादर वासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणा पासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 8, 2022
(हेही वाचा हुंडाई, केएफसी आता पिझ्झा हट…स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार सुरूच)
काय आहे प्रकरण?
लता दीदींवर शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार केल्यावर त्या दिवशी भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लता दीदींचे शिवाजी पार्क येथेच बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे स्मृतीस्थळ बांधण्याची मागणी केली. त्यानंतर लागलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनीही मागणी केली. त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी आम्ही लता दीदींचे भव्य स्मारक उभारणार आहोतच, कुणीही मागणी करून राजकारण करण्याची गरज नाही, असे म्हटले. अशा रीतीने लता दीदींच्या स्मृतीस्थळाच्या विषयावर राजकरण सुरु झाले आहे. त्यामध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांचे ट्विट आता सर्वांचे लक्ष केंद्रित करत आहे.
Join Our WhatsApp Community