मानवंदना देण्यासाठी धडपडणारे ठाकरे सरकार करणार होते लता दीदींची चौकशी!

165

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाल्यावर देशभरात शोककळा पसरली आहे. सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. ठाकरे सरकारमधील सर्व मंत्री लता दीदींच्या कारकिर्दीचा सन्मान करत आहेत. ट्विट करून लता दीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी चढाओढ करत आहेत, त्याच ठाकरे सरकारने दोन वर्षांपूर्वी लता दीदींची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. याची आठवण लता दीदींच्या निधनाच्या दिवशी झाली. हा ठाकरे सरकारचा ढोंगीपणा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिली.

काही कर्तृत्वान व्यक्तीच्या राष्ट्रप्रेमावर शंका घेणे योग्य नाही, अशी शंका घेणे हे सूर्यावर थुंकणाऱ्या व्यक्तीसारखे आहे. अनिल देशमुख हे त्याचीच शिक्षा भोगत आहेत. सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचे काय परिणाम झाले. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः लता दीदींच्या अंत्यसंस्कारासाठी आले, त्यामुळे लता दीदी किती मोठे व्यक्तिमत्व होते, हे आता दिसत आहे.

– सुधीर मुनगंटीवार,
भाजप नेते.

(हेही वाचा लता दीदींवर होता वीर सावरकरांचा प्रभाव! कोणत्या शब्दांत व्यक्त केलेले सावरकर प्रेम?)

अनिल देशमुखांनी दिलेला चौकशीचा आदेश

दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु होते. आंतराराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्वीट केल्यानंतर भारतीय खेळाडू, कलाकार आणि संगीतकारांनी हा देशांतर्गत विषय आहे, असे सांगत अन्य देशातील लोकांनी यात ढवळाढवळ करू नये, अशा आशयाचे मत मांडले होते. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, अभिनेता सुनील शेट्टी, त्यांच्यासह भारतरत्न लता मंगेशकर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही ट्विट केले होते. त्यावेळी अधिवेशनात या विषयावर चर्चा झाली, तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्वांच्या ट्विटची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. यात भारतरत्न लता मंगेशकर यांच्याही ट्विटची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शेतकरी आंदोलनावर आंततराष्ट्रीय ख्यातीच्या लोकांनी ट्वीट केलं. त्यानंतर लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार यांसारख्या सेलिब्रिटींनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणारं ट्वीट केलं. हे सर्व ट्वीट एकाच वेळी कसे आले? ट्वीटचे शब्द सारखेच कसे? एकाच वेळी हे ठरवून करण्यात आलं का, हे पाहण्याचा प्रश्न आहे, असे अनिल देशमुख म्हणाले होते. विशेष म्हणजे त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सभागृहात उपस्थितीत होते. आज त्याच ठाकरे सरकारमधील मंत्री हे लता दीदींचा सन्मान करण्यासाठी चढाओढ करत आहेत.

लता दीदींच्या या ट्वीटवर ठाकरे सरकारने घेतलेला आक्षेप

हे सरकार आणि मंत्री हे कमालीचे ढोंगी आहेत. लता दीदींनी आयुष्यात विचारांची तडजोड कधी केली नाही. वीर सावरकर आणि शिवशाहीर पुरंदरे यांच्यावरील प्रेम त्यांनी काँग्रेसच्या राजवटीतही कधी दडवले नाही, त्याची किंमतही त्यांना चुकवावी लागली होती. अनिल देशमुख सारखा व्यक्ती हा जेव्हा लता दीदींची चौकशी करण्याचा आदेश देतो, तेव्हा या सर्वांचा ढोंगीपणा उघड होतो. आज आपले नाव सर्वांसमोर यावे म्हणून सगळे धडपडत आहेत, हा त्यांचा ढोंगीपणा जनसामान्य ओळखून आहे, त्या ढोंगीपणाचा त्यांना काहीही फायदा होणार नाही.
– माधव भांडारी, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.