राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सकारात्मक चर्चा; कोण घेणार माघार?

120

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बैठकीनंतर, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले की राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याबाबत मविआ आणि भाजप नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, दुपारी तीन वाजता चित्र स्पष्ट होणार आहे.

मविआच्या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काॅंग्रेस नेते सुनिल केदार शामिल होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.

मविआची ऑफर

भाजपने आपला तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा. राज्यसभा निवडणूकीतून भाजपने उमेदवार मागे घेतल्यास, विधान परिषदेला एक जागा आणखी देऊ असा प्रस्ताव मविआकडून भाजपला देण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले.

( हेही वाचा :National Herald Case: राहुल गांधींना ED समोर हजर राहण्यासाठी पुन्हा नवं समन्स )

काय म्हणाले भाजप 

महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेची ही जागा तुम्ही आम्हाला सोडा आणि आम्ही तुम्हाला विधान परिषदेची एक जास्तीची जागा देऊ, असा प्रस्ताव दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. पण चर्चा सकारात्मक होती आणि आता तीन वाजताच चित्र स्पष्ट होईल, असेही भुजबळ यांनी म्हटले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.