निवडणुकीत घोडेबाजार करण्यासाठी पैसा येतो कुठून? ईडीने तपास करावा; राऊतांची मागणी

122

सध्या राज्यसभेच्या उमेदवारीवरुन राज्यातील वातावरण चांगलच ढवळून निघाले आहे. यावर बोलताना शिवसेना नेते आणि खासदार राऊत म्हणाले की घोडेबाजार नावाचा शब्द तो अत्यंत वाईट पद्धतीने महाराष्ट्रात सुरु आहे. राजकारणात निवडणुकीसाठी जो पैसा आणला जातो तो कुठून येतो? याचा तपास ईडीने करायला हवा. अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस एक मॅच्युअर्ड नेते आहेत. आधीच महाराष्ट्राचे राजकीय वातावरण अतिशय प्रदूषित आणि गढूळ झाले आहे. आमदार विकत घेण्यासाठी, त्यांना प्रलोभणे दाखवणारे कोण आहेत?  कोटी- कोटी रुपयांचे जे आकडे ऐकतो. त्यामागचे सुत्रधार कोण आहेत? हे महाराष्ट्राच्या जनतेने विचार करणे, केंद्रीय तपास यंत्रणांनी त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अर्थात सर्वपक्षीय शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी चांगला मार्ग निघत असेल, तर त्यांचे स्वागत केले पाहिजे असे राऊत म्हणाले.

काश्मिरी पंडितांची परिस्थिती नाजूक ..

1990 मध्ये जे झाले ते आता पुन्हा होत आहे. काश्मिरच्या घरवापसीच्या मुद्द्यावर  केंद्र सरकार निवडून आले आणि आता तिथे  टार्गेट किलिंग होत आहे. आता काश्मिरी पंडिताना पलायन करावे लागत आहे. हे जर दुस-या कोणाच्या  सराकारच्या काळात होत असतं,  तर त्याचा भाजपने बोलबाला केला असता. काश्मिरमधील परिस्थिती पाहता आता काश्मीर -2 बनवण्याची गरज असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: J&K Target Killing: पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला; परप्रांतीय मजूरांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

मोहन भागवत यांच्या भूमिकेचे स्वागत 

आधी काश्मिरी पंडितांचे जीवन वाचवा, मग मंदिरांमध्ये शिवलिंग शोधा. सरसंघचालक मोहन भागवत बरोबर बोलले, मी त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे. मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणे गरजेचे आहे. हा रोजचा वाद बंद व्हावा, नाहीतर देश देश राहणार नाही. मंदिरांखाली शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मिरी पंडितांच्या प्राणांची, काश्मीरची रक्षा कशी करावी याचा विचार करावा, असे राऊत यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.