राज्यात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर याविरोधात कायदा करण्याच्या हालचाली आता सरकारकडून सुरू झाल्या आहेत. त्यानुसार, राज्य विधीमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मिळत आहे. श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करण्याच्या तयारी असून उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याचा प्रयत्न करत आहे.
(हेही वाचा – आता ‘आधार’वरून कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही, UIDAI ची मोठी माहिती!)
महाराष्ट्रात लव्ह जिहादची प्रकरणं वाढत असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी शिंदे-फडणवीस त्याविरोधात पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेशात जसा लव्ह जिहाद कायदा आहे, तसा महाराष्ट्रात सुद्धा लागू करावा यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक मांडले गेल्यास हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. तसेच या विधेयकाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कोणती पाऊलं उचलली जाणारे याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर व्हावा, यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. यापूर्वी देखील भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधात कायदा करावा अशी मागणी केली होती. त्यादृष्टीने महाराष्ट्रात सरकार चाचपणी देखील करत आहे. सध्या उत्तर प्रदेशात अशा प्रकारचे लव्ह जिहाद विरोधात कायदा अस्तित्वात आहे. उत्तर प्रदेशातील या कायद्यातील तरतुदींनुसार, लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर करणे, कोणाशीही खोटं बोलून विवाह करणे तसेच अशा विवाहाला सहाय्य करणं हे कायद्यानुसार गुन्हा आहे.