ठाकरे गटाते नेते खासदार संजय राऊत यांनी जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून राऊतांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जीवे मारण्याच्या धमकीचा मॅसेज राऊतांना मोबाईलवर पाठवण्यात आला आहे. या मॅसेजमध्ये त्यांना शिवीगाळ करण्यात आली आहे.
( हेही वाचा : संजय राऊतांच्या अडचणी वाढणार; मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मानहानीची नोटीस )
संजय राऊतांना धमकी
शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास राऊतांना हा मॅसेज आला असून यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
“सलमान और तू फिक्स”
संजय राऊतांनी लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून हा धमकीचा मॅसेज पाठवण्यात आला आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाप्रमाणे दिल्लीत संजय राऊतांचीही हत्या करण्याची धमकी यामध्ये देण्यात आली आहे. ‘हिंदूविरोधी असल्यामुळे मारून टाकू, दिल्लीमध्ये आल्यावर AK 47 ने उडवून टाकू, मुसेवाला टाईप मारू.. लॅारेन्स के और से मॅसेज है…. सलमान और तू फिक्स….तयारी करके रखना….’ असं या मॅसेजमध्ये म्हटलं आहे. तसेच या मॅसेजमध्ये संजय राऊत यांना अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community