Badlapur School Case प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र घेण्यास वकिलांचा नकार

आरोपीला न्यायालयात आणण्यासाठी न्यायालयाच्या परिसरात चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

185

बदलापूर येथे एका शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार (Badlapur School Case) करणारा वासनांध अक्षय शिंदेला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. तर आता आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिल्याचे कळत आहे.

(हेही वाचा Badlapur School Case : बदलापूर आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू, विविध पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल)

कल्याण न्यायालयातील वकिलांनी त्याचे वकीलपत्र घेण्यास नकार दिला आहे. आरोपीला न्यायालयात आणण्यासाठी न्यायालयाच्या परिसरात चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोपीवर हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी ही दक्षता बाळगली होती. बदलापूरमधील या संतापजनक घटनेनंतर (Badlapur School Case), बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. रेल्वे ट्रॅकवर उतरत बदलापूरकरांनी ठिय्या आंदोलन केले, रास्ता रोको केला. त्यानंतर आता बदलापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. बदलापूरमधील इंटरनेट पूर्णपणे बंद आहे. कालच्या आंदोलनानंतर बुधवारी बदलापूरमधील रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरु आहे. पण काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर बदलापूरमध्ये कलम 163 लागू करण्यात आले आहे. तर शहरातील दुकाने देखील बंद आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.