शरद पवार अन् जरांगेंची एकसमान लाईन; OBC आंदोलक Laxman Hake यांचं टीकास्त्र

144
शरद पवार अन् जरांगेंची एकसमान लाईन; OBC आंदोलक Laxman Hake यांचं टीकास्त्र
शरद पवार अन् जरांगेंची एकसमान लाईन; OBC आंदोलक Laxman Hake यांचं टीकास्त्र

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) व नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांची ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा बुधवारी अहमदनगरच्या जामखेड येथे दाखल झाली. यावेळी बोलताना लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार व मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची लाईन एकसमान आहे. त्यामुळे जरांगे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार नाहीत हे माझ्याकडून कागदावर लिहून घ्या, असा दावा हाके यांनी केला आहे. (Laxman Hake)

(हेही वाचा –मी या कोर्टाचा इनचार्ज आहे; CJI Chandrachud आणि वकील यांच्यात भर सुनावणीत खडाजंगी)

लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणाले की, “मनोज जरांगेंनी जरुर विधानसभेची निवडणूकी लढवावी. पण त्यांची व शरद पवार यांची लाईन एकसमान आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभा लढवण्याची किती वल्गना केली, तरी ते निवडणूक लढवणार नाहीत. हे माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून लेकीबाळींना शरमेने मान खाली घालण्याची वेळ येईल अशी भाषा वापरणे, आई-बहिणीवरून शिवीगाळ करणे, ही काही निवडणूक लढवण्याची साधने आहेत का?”

(हेही वाचा –Crime : मुंबईत मठाधिपती माधवाचार्यांवर अज्ञातांकडून पूजा सुरू असताना प्राणघातक हल्ला)

“मनोज जरांगे मान्य न होणाऱ्या मागण्या घेऊन आंदोलन करत आहेत. हे त्यांना व त्यांना सल्ला देणाऱ्यांनाही ठावूक आहे. त्यामुळे महापुरुषांच्या प्रतिमेखाली बसून शिवराळ भाषा वापरणारा हा माणूस तारीख पे तारीख देण्यापेक्षा दुसरे काहीही करू शकत नाही. निवडणुकीत ते कुणाविरोधात प्रचार करतात हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे जरांगेंपुढे निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या नेत्याचा प्रचार करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. त्यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी कोणताही विचार किंवा मॉडेल नाही.” असेही लक्ष्मण हाके यावेळी बोलताना म्हणाले. (Laxman Hake)

(हेही वाचा –India’s Tour of Sri Lanka : गौतम गंभीरचा पहिल्यांदाच भारतीय संघाबरोबर सराव, संजू सॅमसनला दिले फलंदाजीचे धडे )

लक्ष्मण हाके पुढे बोलताना म्हणाले की, मनोज जरांगेंना ओबीसींमध्ये फूट पाडायची आहे. त्यांना धनगर आरक्षणाविषयी कोणताही जिव्हाळा नाही. शरद पवार बारामतीत जी विधाने करतात तीच लाईन नंतर जरांगे पकडतात. धनगर समाजाला ओबीसीत 3 टक्के आरक्षण मिळते. पण जरांगे आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. असं ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.