मनोज जरांगे (Manoj Jarange) जी गाडी वापरतात ती गाडी वाळू माफियांची असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ज्या वाळू माफियांचा पाठिंबा होता, त्यांचा सपोर्ट घेणे न घेणे हे कायदा सुव्यवस्था बघून घेईल. वाळू कोणी ओढावी, कायद्याचा भंग कोणी करावा, महसूल कोणी बुडवावा आणि जे बुडवतील त्यांना कायदा बघून घेईल. परंतु या अशा माफियांच्या जोरावर आंदोलन उभे करून या महाराष्ट्रातल्या (Maharashtra) ओबीसींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करत असतील तर मला ते वाटते की खूप मोठे पातक या लोकांकडून घडले असल्याची टीका लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केली आहे. (Manoj Jarange)
(हेही वाचा : Crime : वांद्रेत वृद्ध महिलेची हत्या, २ तासात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात)
ते पुढे म्हणाले की, वाळू उपसा करणारे, महसूल बुडवणारे, गोदावरी नदीची चाळण करणारे यांना काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमंत्रित करतात का, तुम्ही अशी वाळू ओढा म्हणून? त्यामुळे मला असे म्हणायचे आहे की या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे जर हे गुंड आणि फक्त वाळू माफियांपूर्त मर्यादीत नाही, असे ही हाके म्हणाले.
दरम्यान लक्ष्मण हाके म्हणाले की, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विनंती केली आहे की त्यांनी केवळ महसूलाच्याच नव्हे तर ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) विरोधात जे काही षडयंत्र या महाराष्ट्रात रचले गेले, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे कार्य या लोकांकडून झाले, या लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि यांच्या मागे हे षडयंत्र रचणारा जर सुरेश धस यांच्या भाषेत बोलायचे झाले तर यांचा आका कोण होता याचा शोध घेतला पाहिजे. (Manoj Jarange)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community