गेल्या आठ दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या जालना जिल्ह्यात उपोषण सुरू केले आहे. शिवसेना उबाठाचे प्रवक्ते आणि नुकत्याच लोकसभा निवडणुकीत डिपॉजिट जप्त झालेल्या हाके यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून यांचे हे ‘राजकीय उपोषण’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Laxman Hake)
हाके सोलापूरचे, उपोषण जालन्याला
४६ वर्षीय लक्ष्मण हाके हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात जुजारपुर गावचे रहिवासी. त्यांनी पुण्यात एमए पदवी शिक्षण पूर्ण करून काही काळ पुण्याच्याच फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे तर त्यांच्या पत्नी विद्या या प्राध्यापक आहेत. (Laxman Hake)
विधानसभेला ‘नोटा’हून कमी मते
२०१९ मध्ये सांगोला विधानसभा मतदार संघातून लक्ष्मण हाके यांनी शिवसनेचे शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात बहुजन विकास आघाडीचे (बविआ) उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळवून डिपॉजिट करून घेतले. ‘नोटा’ला ७०० मते पडली तर हाके यांना केवळ २६७ मते मिळाली. (Laxman Hake)
(हेही वाचा – Fraud : साताऱ्यात बंटी आणि बबलीने लाखो रुपये लुबाडले; पंतप्रधान कार्यालयातील सल्लागार, रॉ एजंट असल्याचे सांगायचे)
मागासवर्ग आयोगाचा राजीनामा, लोकसभेची तयारी
२०२१ मध्ये त्यांची नियुक्ती राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी झाली. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये हाके यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उबाठाचे शिवबंधन हातात बांधले आणि काही दिवसातच ते उबाठाचे प्रवक्ते म्हणून नियुक्त झाले. २०२३ मध्ये मजोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समाज आणि राज्य सरकारकडून मिळणारा प्रतिसात, माध्यमांकडून मिळणारी प्रसिद्धी पाहून उबाठाचे प्रवक्ते असेलल्या हाके यांनी शिंदे सरकारवर ‘राजकीय हस्तक्षेपा’चे मोघम आरोप करत राज्य मागासवर्ग आयोग सदस्यत्वाचा डिसेंबर २०२३ मध्ये राजीनामा दिला आणि लोकसभेच्या तयारीला लागले. (Laxman Hake)
क्षूल्लक जनाधार, ‘मविआ’ने तिकीट नाकारले
धनगर समाजातून येणारे लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांची २०२४ लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची इच्छा होती, मात्र त्यांना असलेला क्षुल्लक जनाधार पाहता त्यांना तिकीट नाकारण्यात आले. शरद पवार यांनी धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली गेली पण ऐनवेळी जानकर महायुतीत गेले आणि पवार यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांचा पक्षात प्रवेश करीत त्यांना उमेदवारी दिली आणि निवडूनही आणले. (Laxman Hake)
पुन्हा डिपॉजिट जप्त, विधानसभेची तयारी
शिवसेना उबाठाकडूनही अपेक्षाभंग झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी माढा लोकसभा मतदार संघातून अपक्ष अर्ज दाखल केला आणि निवडणूक लढवली. सांगोला विधानसभा निवडणुकीनंतर हाके यांना या लोकसभा निवडणुकीतही आपले डिपॉजिट वाचवता आले नाही. मात्र यावेळी ‘नोटा’पेक्षा अधिक मते हाके यांनी मिळवली. ‘नोटा’ला ३,७०२ मते पडली तर हाके यांना ५,१३४ मते मिळाली पण विजयी उमेदवाराकडून ६.१७ लाख मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. (Laxman Hake)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community