विधानसभा आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदावरुन Congress आणि UBT मध्ये जुंपणार

34
विधानसभा आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदावरुन Congress आणि UBT मध्ये जुंपणार
  • प्रतिनिधी

भविष्यात विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी उबाठाने दावा केला तर काँग्रेसतर्फे (Congress) विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जाणार आहे. तशा हालचाली काँग्रेस नेत्यांनी सुरू केल्या असून या संबंधीचा तोंडी प्रस्तावही उबाठाकडे देण्यात आल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे.

(हेही वाचा – Eknath Shinde निश्चिंत; Ajit Pawar गॅसवर..)

मागील सरकारमध्ये विधानसभेचे विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडे (Congress) होते. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेता पद भूषवले होते. तर विधान परिषदेमध्ये उबाठाचे अंबादास दानवे विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहत होते. परंतु आत्ताच झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील कोणत्याच एका पक्षाला विरोधी पक्ष नेतापद संख्येअभावी मिळू शकत नाही. २८८ विधानसभा सदस्यांच्या किमान दहा टक्के जागा असाव्या लागतात. म्हणजेच किमान २९ आमदार एकाच पक्षाचे असले पाहिजेत.

(हेही वाचा – Mumbai Traffic Police : बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा; २०९९ चालकांवर कारवाई)

विधान परिषदेत अजूनही विरोधी पक्ष नेते म्हणून अंबादास दानवे धुरा सांभाळून आहेत. तेव्हाच्या संख्याबळाच्या जोरावर उबाठाने हे विरोधी पक्ष नेतापद आपल्याकडे ठेवले होते. परंतु सत्ता परिवर्तनानंतर शिंदेंबरोबर नंतरच्या काळात गेलेल्या विधान परिषद सदस्यांमुळे उबाठाची संख्या कमी झाली आहे.

(हेही वाचा – Air Pollution : भारतात 10 वर्षात 38 लाख लोकांचा मृत्यू)

विधान परिषदेत कोणाचे किती संख्याबळ

विधानपरिषदेत उबाठाचे सात व काँग्रेसचे सात सदस्य आहेत. शरद पवार गटाचे पाच सदस्य आहेत. काँग्रेस व ठाकरेंचे संख्याबळ समान असल्यामुळे काँग्रेसने (Congress) परिषदेवर आपला दावा सादर करणार आहे. असे करून काँग्रेस उबाठाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहे.

(हेही वाचा – राज्यात जखमी वन्यप्राण्यांसाठी उभारणार निवारा केंद्र; State Govt कडून ८ कोटी ६४ लाखांच्या निधीची तरतूद)

निर्णय विधानसभा अध्यक्ष तसेच उपसभापती घेणार

संसदीय राजकारणात विरोधी पक्षनेता पदाला काही संविधानिक अधिकार देखील प्राप्त झाले आहेत. हे पद ज्या पक्षाला मिळते त्या पक्षाला विधिमंडळात वेगळे कार्यालय तसेच स्टाफ देखील मिळतो ज्या आधारे ते राज्यातील वेगवेगळ्या विभागांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांची थेट माहिती देखील मागवतात. त्याचा अप्रत्यक्ष फायदा देखील त्या पक्षाला होत असतो. यामुळेच काँग्रेस (Congress) विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणी ठाकरे गटाला विरोधी पक्षनेता पद देण्यास इच्छुक नाही. या कारणामुळे महाविकास आघाडीमध्ये आपापसात मोठी फूट देखील पहावयास मिळते. असे असले तरी येणाऱ्या अधिवेशनामध्ये याचा निर्णय शेवटी विधानसभा अध्यक्ष तसेच विधान परिषदेच्या उपसभापती घेणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.