ठाकरे गटाचा पुण्यातील नेता भाजपमध्ये प्रवेश करणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

90

पुण्यात येत्या काही दिवसांत मोठा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचा नेता यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. याच चर्चेला दुजोरा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ठाकरे गटातले जो नेता आमच्याकडे येत आहेत, तो नेता मोठा आहे की छोटा याला अर्थ नाही. त्यांच्याकडे सेना शिल्लक होतेय. आणि असे जरुरी नाही की, पक्षप्रवेश मोठा असला तर मोठा नेता पक्षप्रवेश करतो. कधी कधी छोटा कार्यकर्ताही दमबाज असतो. त्यामुळे नेता मोठा आहे की छोटा याच्यामध्ये नाही जायला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दररोज त्यांचे (ठाकरे गटाचे) लोकं चालले आहेत, आमच्याकडे रोज येतायत. त्यामुळे ही सेना शिल्लक, शिल्लक होत किंचित होणार आहे. पुढच्या काळात ही किंचित सेना होणार आहे. त्यामुळे या भीतीने उद्धव ठाकरे बोंबाबोंब करतायत.

(हेही वाचा – २०१९मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी शिंदेंचे दिले होते नाव, पण शरद पवारांनी….; अरविंद सावंतांचा मोठा गौप्यस्फोट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.