दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) बुधवार, १२ डिसेंबरला ‘दि साबरमती रिपोर्ट’ (The Sabarmati Report) चित्रपटाच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळाच्या दरम्यान मोठा गोंधळ झाला. विद्यापीठात लावलेली चित्रपटाची पोस्टर्स फाडण्यात आले. तसेच दगडफेकीची घटनाही घडली असून अभाविपने डाव्यांवर याचा आरोप केला आहे. या गोंधळानंतर चित्रपटाचा खेळ थांबवण्यात आला.
यापूर्वी जेव्हा आम्ही एका चित्रपटाचा खेळ आयोजित केला होता, तेव्हाही डाव्यांनी असेच केले होते. त्यात एका गार्डच्या पायाला दुखापत झाली होती. आजही डाव्या विद्यार्थ्यांकडून दगडफेक झाली, त्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप अभाविपने केला. बॅडमिंटन कोर्टमध्ये या (The Sabarmati Report) चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली आणि चित्रपटाचे पोस्टर फाडले. या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण आहे. विक्रांत मॅसीचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाची खूप चर्चा झाली. गुजरातमधील 2002 च्या गोध्रा घटनेच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बनवण्यात आला असून त्यात अनेक सामाजिक प्रश्नही मांडण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व कॅबिनेटसाठी या चित्रपटाची स्क्रीनिंग आयोजित करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community