महापुरूषांचा अपमान रोखण्यासाठी संभाजीराजेंची मोठी मागणी; म्हणाले, ‘नियम मोडला तर…’

96

राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानजनक वक्तव्य केल्यानंतर राज्यातील वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. तसेच राजकारणातील घडामोडींनाही वेग आला आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होणारे वक्तव्य केल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्ष आक्रमक होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची आक्रमक मागणी केली आहे. तर महापुरूषांचा अपमान रोखण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मोठी मागणी केली आहे.

(हेही वाचा – OYO Layoffs: दुसऱ्यांदा कर्मचारी कपात, 600 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार)

काय म्हणाले संभाजीराजे

भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महारांजाचा अवमान होत आहे. भाजप नेते प्रसाद लाड एकीकडे महाराजांना दैवत मानतात तर दुसरीकडे महाराजांचा अभ्यास ठेवत नाही. भाजपने अशा लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे. राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर हाकलून देण्याची पहिली मागणी मी केलेली आहे. जोपर्यंत त्यांना राज्याबाहेर हाकललं जात नाही, तोपर्यंत स्वराज्य संघटना लढणार आहे. एवढे सगळे लोक महाराजांबद्दल बोलत असताना भाजप ठाम भूमिका का घेत नाही. यातून भाजपाचा दुटप्पीपणा दिसून येतो.

पुढे ते असेही म्हणाले की, महापुरूषांबद्दल बोलताना तारतम्य असले पाहिजे. यासाठी आता कायदा करायला हवा, जेणेकरून कोणाचे धाडस होणार नाही. वारंवार महापुरूषांबद्दल बोलणाऱ्यांनी नियम मोडले तर राज्यातून हाकलून देण्याची तरतूद कायद्यात पाहिजे. दरम्यान, प्रसाद लाड यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी दिलीगिरी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.