-
प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विधिमंडळ समित्यांसाठी पात्र सदस्यांची नावे अद्याप सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून पाठवण्यात आलेली नाहीत. यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी नाराजी व्यक्त केली असून, पक्षांनी तात्काळ नावे पाठवावीत, अन्यथा आपल्या अधिकार कक्षेत नियुक्त्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
२९ समित्यांसाठी सदस्य नियुक्ती प्रक्रियेत उदासीनता
विधानसभेच्या कामकाजासाठी एकूण २९ समित्या कार्यरत आहेत. या समित्यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या २३७ आणि विरोधी पक्षाच्या ५१ सदस्यांना संधी मिळणार आहे. मात्र, समित्यांसाठी आवश्यक असलेल्या नावांची यादी अद्याप संबंधित पक्षांकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे विधिमंडळ सचिवालयाने पक्षांना पत्र पाठवून यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. (Rahul Narvekar)
(हेही वाचा – अल्पसंख्याक शाळा मान्यतेबाबतच्या निर्णयाला CM Devendra Fadnavis यांची स्थगिती)
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा इशारा
समित्यांमध्ये नियुक्त्या न झाल्यास विधिमंडळाचे कामकाज अडचणीत येऊ शकते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना तातडीने सदस्यांची नावे पाठवण्याची सूचना केली आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पक्षांनी उदासीनता दाखवली तर समित्यांवरील नियुक्त्या आपल्या अधिकार कक्षेत राहतील आणि त्या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल.
राजकीय पक्षांची भूमिका काय?
विधिमंडळ समित्या राज्याच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून या समित्यांसाठी अपेक्षित गांभीर्य न दाखवले जाण्याची स्थिती आहे. त्यामुळे आता राजकीय पक्ष या सूचनेला कितपत प्रतिसाद देतात आणि विधिमंडळ अध्यक्ष पुढे काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. (Rahul Narvekar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community