अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. राजकारणामध्ये सध्या अनेक वेगाने गोष्टी अगदी वेगाने घडत आहेत. अशातच ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यासोबत दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत सामिल होणार आहेत. आज म्हणजेच शुक्रवार ७ जुलै रोजी दुपारी गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तिय राहुल कनाल यांनी ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे.
(हेही वाचा – President Draupadi Murmu : संत, समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू)
आदित्य ठाकरेंच्या मुद्द्यावर ज्यावेळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे गटाला घेरलं होतं. त्यावेळी उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे यांनी आपल्या आमदारांना बोलू द्यायला हवं होतं, मात्र त्यांनी तसं न केल्याने उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना खडे बोल सुनावले होते, अशी माहिती समोर आली होती.
त्यानंतर नीलम गोऱ्हेंचा शिंटे गटाकडे ओढा वाढत गेला. मुख्यमंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमांना त्या प्रोटोकॉल म्हणून उपस्थित असायच्या. तसेच, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नीलम गोऱ्हेंच्या पुण्याच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज अखरे दुपारी नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community