Legislative Council Election : दोन ज्येष्ठ महिला नेत्यांचे विधान परिषदेत पुनर्वसन; मंत्रीपदाची शक्यता

143
Legislative Council Election : दोन ज्येष्ठ महिला नेत्यांचे विधान परिषदेत पुनर्वसन; मंत्रीपदाची शक्यता

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवसाणुकीसाठी महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार दिल्याने १२ जुलैला निवडणूक होणार आहे. महायुतीने दिलेल्या ९ उमेदवारांमध्ये दोन महिला उमेदवार असून एक राज्यातील ज्येष्ठ माजी मंत्री तर एक पाच वेळा खासदार असलेल्या उमेदवार आहेत. राज्यातील पावसाळी अधिवेशनानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार झालाच तर या दोन्ही महिलांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Legislative Council Election)

उबाठाकडून तिसरा उमेदवार म्हणजे घोडेबाजाराला चालना

महायुतीच्या ९ उमेदवारांमध्ये भाजपाचे पाच असून त्यात एक ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे आहेत. तर अन्य उमेदवार परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर हे आहेत. अन्य चार उमेदवारांमध्ये शिवसेना (शिंदे) यांचे दोन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून दोन उमेदवारांचे संख्याबळ असताना तिसरा उमेदवार, उबाठाचे मिलिंद नार्वेकर यांना उतरवून निवडणुकीत घोडेबाजाराला चालना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Legislative Council Election)

(हेही वाचा – New Criminal Law : नवीन कायद्याच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी राज्यात ७६, तर मुंबईत १६ गुन्हे दाखल)

आश्वासन पाळले; परिषदेवर संधी

शिवसेनेच्या (शिंदे) दोन उमेदवारांमध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून आलेल्या माजी खासदार भावना गवळी यांचा समावेश आहे. गवळी यांच्या लोकसभा उमेदवारीला भाजपाने विरोध केल्याने त्यांचे तिकीट कापण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे गवळी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. (Legislative Council Election)

विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर

राज्य मंत्रिमंडळाचा नियोजित विस्तार हा विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आला होता. विस्तारात डावलल्याच्या नाराजीचा परिणाम परिषद निवडणुकीवर होऊन मते फुटू नये याबाबत सावधानता बाळगाण्यात आल्याचे सांगण्यात आले. विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली असती तर कदाचित विस्तार लवकर झाला असता मात्र निवडणूक झाली तर विस्तार या पावसाळी अधिवेशनानंतर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या विस्तारात पंकजा मुंडे आणि भावना गवळी यांना मंत्रिपदाची संधी दिली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Legislative Council Election)

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार

पंकजा मुंडे (भाजपा)
परिणय फुके (भाजपा)
सदाभाऊ खोत (भाजपा)
अमित गोरखे (भाजपा)
योगेश टिळेकर (भाजपा)

भावना गवळी (शिंदे गट)
कृपाल तुमाने (शिंदे गट)

राजेश विटेकर (राष्ट्रवादी अजित पवार गट)

शिवाजीराव गर्जे (राष्ट्रवादी अजित पवार गट)

प्रज्ञा सातव (काँग्रेस)
मिलिंद नार्वेकर (उबाठा)

जयंत पाटील (शेकाप) (Legislative Council Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.