- सुजित महामुलकर
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी उद्या शुक्रवारी, १२ जुलैला विधानसभेतील २७४ आमदार मतदान करणार आहेत. ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी लोकसभेनंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी होणारी शरद पवार विरुद्ध अजित पवार यांची ही दुसरी थेट लढत होणार आहे. यात कोणत्या राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकतो आणि कोणत्या राष्ट्रवादीचा हरतो, यावर महायुती आणि महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीची काही गणिते अवलंबून असतील. (Legislative Council Election)
कुणाची मते फुटणार, कुणाला खिंडार
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव गर्जे आणि शरद पवार पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील या दोन उमेदवारांमध्ये खरी लढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. गर्जे निवडून आले तर महाविकास आघाडीची मते फुटली असा त्याचा अर्थ निघू शकतो तर पाटील निवडून आल्यास अजित पवार गटाला खिंडार पडण्याची ही नांदी असू शकते. (Legislative Council Election)
दोन्ही बाजूकडून प्रयत्न
विधानसभेत सध्याचं संख्याबळ लक्षात घेता राजीनामा दिलेले, निलंबित सदस्य तसेच मृत्यू झालेल्या सदस्यांमुळे २८८ पैकी १४ जागा रिक्त असून २७४ आमदार विधानसेभेत आहेत. यापैकी महायुतीकडे तीन प्रमुख पक्षांचं एकूण संख्याबळ १८१ इतकं आहे. यात भाजपाचे १०३, शिवसेनेचे ३७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ३९ आमदार आहेत. त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाचा एक आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या एका आमदाराचं पाठबळ अपेक्षित आहे. त्यामुळे महायुतीचे पक्षीय बलाबल लक्षात घेता ८ उमेदवार जिंकून येण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार नाहीत. १३ अपक्षांपैकी ७ अपक्षांचा भाजपाला पाठिंबा आहे. मात्र एका उमेदवारासाठी अन्य अपक्ष तसेच मनसेचे एक, बहुजन विकास आघाडीची तीन मतं मिळवण्यासाठी दोन्ही बाजूकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. महायुतीच्या ९ मध्ये भाजपाचे ५, शिवसेना (शिंदे) २ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आहेत. (Legislative Council Election)
(हेही वाचा – Jansanman Mahamelava: पराभव झाला तिथूनच विधानसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार; Ajit Pawar यांची बारामतीत जाहीर सभा)
किमान २३ मतांची गरज
एका उमेदवाराला निर्विवाद निवडून येण्यासाठी किमान २३ पहिल्या पसंतीच्या मतांची गरज आहे तर शेवटचा उमेदवार कदाचित दुसऱ्या-तिसऱ्या पसंतीच्या मतांवर चुरशीच्या लढतीत निवडून येऊ शकतो. (Legislative Council Election)
क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता
तर महाविकास आघाडीनं तीन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे सदस्यांची बिनविरोध निवड झाली असती ती निवडणूक आता रंगतदार होणार असे दिसते. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांकडे ६६ (काँग्रेस ३७, उबाठा १६ आणि राष्ट्रवादी-शप १३) इतकं संख्याबळ आहे. त्यांना समाजवादी पक्षाच्या दोन, शेकाप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रत्येकी एका आमदाराचा पाठिंबा मिळू शकतो. हे बलाबल पाहता महाविकास आघाडीचे दोन उमेदवार सहज जिंकून येऊ शकतात, मात्र महाविकास आघाडीनं तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे मतांच्या बेगमीसाठी क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता वाढली आहे. तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीला मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. (Legislative Council Election)
गुप्त मतदान
तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीला मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. या निवडणुकीसाठी विधानसभेतल्या आमदारांकडून गुप्त मतदान पद्धतीद्वारे हे मतदान होणार आहे . या निवडणुकीत निर्धारित कोट्याप्रमाणे पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांनुसार उमेदवार निवडून येणार आहे. संबंधित आमदारांची संख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतं. (Legislative Council Election)
उमेदवार कोण?
भाजपा – पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत
शिवसेना – भावना गवळी आणि कृपाल तुमाने
राष्ट्रवादी – राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे
काँग्रेस – प्रज्ञा सातव
उबाठा गट – मिलिंद नार्वेकर
शेकाप – जयंत पाटील (शरद पवार गटाचे समर्थन) (Legislative Council Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community