Legislative Council Elections 2024: भाजपाकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर; कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे, तर…

306
Legislative Council Elections 2024: भाजपाकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर; कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे, तर...

लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या सातही टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, येत्या ४ जून रोजी मतदानाचे निकाल जाहीर होणार आहेत. लोकसभेची रणधुमाळी संपल्यानंतर आता राज्याला लक्ष लागलं आहे ते विधानपरिषद निवडणुकीकडे (Legislative Council Elections). दरम्यान विधान परिषदेच्या ४ जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्या असून, कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहेत, या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजपाने तीन मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार जाहीर केले आहेत. विधान परिषदेच्या या जागांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. (Legislative Council Elections 2024)

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : कोहलीने रोहितबरोबर सलामीला यावं असं गावसकर यांना का वाटतं?)

मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार (Kiran Shelar in Mumbai graduate constituency) आणि आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवनाथ दराडे (Shivnath Darade in Mumbai Teachers Constituency) तर कोकण पदवीधर मतदार संघांसाठी निरंजन डावखरे (Niranjan Davkhare Konkan graduate constituencies) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली गेली असली तरी, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधील घटक पक्षांमध्ये एकमत झाल्याचे चित्र दिसत नाही. मनसे कडून अभिजीत पानसे (MNS Abhijeet Panse) यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे भाजपाची कोंडी झाली होती. मात्र भाजपाने कोकण पदवीधर मतदारसंघाच निरंजन डावखरे यांना पुन्हा संधी दिल्याने येथील लढत रंगतदार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.   (Legislative Council Elections 2024)

(हेही वाचा – Suicide : ‘आयएएस’ दाम्पत्याच्या मुलीची इमारतीच्या १०व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या)

दुसरीकडे मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने किरण शेलार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. किरण शेलार यांचा सामना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याशी होणार आहे. तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून भाजपाकडून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवनाथ दराडे यांच्यासमोर ठाकरे गटाचे ज.मो. अभ्यंकर यांचे आव्हान आहे. (Legislative Council Elections 2024) 

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.