Legislative Council Elections : महाविकास आघाडी शेकापचा गेम करणार…

97
Legislative Council Elections : महाविकास आघाडी शेकापचा गेम करणार...

विधान परिषदेच्या निवडणुकीत महावविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तिसरा अर्ज भरल्याने निवडणूक बिनविरोध होणार नाही. दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन नार्वेकर यांना पाठिंबा दर्शवल्याने या परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांचा महाविकास आघाडी गेम करणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Legislative Council Elections)

अजित पवार यांच्या आमदारांबाबत साशंकता

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलैला निवडणूक होणार असून त्यात विधानसभेतील आमदार मतदान करणार आहेत. विधान सभेतील पक्षीय बलाबल लक्षात घेता महायुतीचे पारडे जड आहे. एका उमेदवारला किमान २३ मतांची गरज लागते. भाजपाचे १०३, शिवसेना (शिंदे) ३७ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ३९ आमदार विधानसभेत असून अन्य अपक्ष मिळून महायुतीचे नऊ उमेदवार, पसंतीचे गणित लक्षात घेऊन, निवडून येऊ शकतात, हे उघड आहे. यामध्ये अजित पवार यांच्या आमदारांबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र महायुतीचे उमेदवार पसंतीच्या गणितावर निवडून येण्याची शक्यता अधिक आहे. (Legislative Council Elections)

(हेही वाचा – Land Jihad : उत्तन येथील बालेशाह पीर दरगाह अतिक्रमणाची पाठराखण करणाऱ्या तहसीलदार, तलाठ्याच्या चौकशीचा आदेश)

नार्वेकरांसाठी प्रयत्नांती परमेश्वर

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ३७, शरद पवार गत १३ आणि शिवसेना उबाठा १६ तसेच त्यांचे काही समर्थक लहान पक्ष एकत्रित धरले तरी दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतील, अशी स्थिति आहे. दरम्यान काँग्रेसने २०२२ ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्यासाठी ३० मतांचा कोटा ठेवण्यात आला असून उर्वरित ७ मते अन्य उमेदवाराला देण्यात येतील. ती ७ अधिक शिवसेना उबाठा ची १६ मते अशी काटावरची २३ मते नार्वेकर यांना मिळू शकतात. त्यापेक्षा अधिक मतांसाठी नार्वेकर यांना विशेष प्रयत्न करावे लागतील, असे समजते. (Legislative Council Elections)

… तर शेकापचे अस्तित्व संपुष्टात

शेकापचे जयंत पाटील यांना शरद पवार गटाची १३ मते आणि अन्य अपक्ष मिळून किमान १२-१३ मतांची गरज आहे, ती मिळवण्यात पाटील यांना यश आले तर त्यांचा या निवडणुकीत विजय होऊ शकतो अन्यथा विधान परिषदेतील शेकापचे अस्तित्व संपुष्टात येईल. कारण जयंत पाटील हे एकमेव आमदार सध्या विधान परिषदेत आहेत. ७९ वर्षीय जयंत पाटील गेली २४ वर्षे विधान परिषदेवर आमदार म्हणून सक्रिय असून रायगड जिल्ह्यातील शेकापचा मोठा चेहेरा आहे. (Legislative Council Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.