Legislative Council Elections : अजित पवारांकडून शरद पवारांना धक्का; विधान परिषद निवडणुकीत शरद पवार पुरस्कृत उमेदवार पाडला

202
Legislative Council Elections : अजित पवारांकडून शरद पवारांना धक्का; विधान परिषद निवडणुकीत शरद पवार पुरस्कृत उमेदवार पाडला

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत अखेर शरद पवार यांना त्यांचे पुतणे अजित पवार यांनी धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांना निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले आणि महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून आले, याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी आता जवळपास स्पष्ट झाले आहे. तर महाविकास आघाडीकडून शेकापला पाडण्यात आले. आता जयंत पाटील यांनी तीन महिन्यानंतर रायगड जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. (Legislative Council Elections)

काँग्रेसची ५ मते फुटली

अजित पवार यांच्याकडे त्यांच्या अपक्ष समर्थकांसह ४२ (आमदार) मतदार होते तर त्यांच्या दोन उमेदवारांना ४७ मते मिळाली. त्यामुळे काँग्रेस आमदारांनी अजित पवार यांच्या उमेदवारांना मतदान केले, असा अर्थ निघू शकतो. काँग्रेसकडे ३७ मते असताना काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना २५ मते मिळाली तर अधिकची मते अन्य पक्षांना गेली, असे सांगण्यात येते. (Legislative Council Elections)

शिंदे-फडणवीस-पवार तीन वेळा बैठक

अजित पवार यांनीही पत्रकारांशी बोलताना पाच मते अधिकची मिळाल्याचे मान्य केले. तसेच ‘त्या’ आमदारांनी आपल्या उमेदवारांना मतदान केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. तसेच या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपली तीन वेळा बैठक झाली होती, असे सांगून हाच ट्रेंड पुढे विधानसभा निवडणुकीत राहील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. (Legislative Council Elections)

(हेही वाचा – Legislative Council Election : शरद पवार विरुद्ध अजित पवार लढत?)

ठाकरे यांचे निकटवर्तीय

विधान परिषदेतील ११ नवनियुक्त आमदारांमध्ये महायुतीतील भाजपाचे ५, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचे प्रत्येकी २ उमेदवार निवडून आले. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या तीनपैकी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या जयंत पाटील या एका उमेदवाराचा पराभव झाला तर अन्य दोन काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर विजयी झाले. (Legislative Council Elections)

लोकसभेचे उट्टे काढले

‘हिंदुस्थान पोस्ट’ने गुरुवारी ‘शरद पवार विरुद्ध अजित पवार’ अशी ही लढत असल्याची बातमी दिली होती. त्यानुसार अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत बारामतीतील त्यांच्या पराभवाचे उट्टे काढले, असे म्हणता येईल. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांना शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी पराभूत केले होते. (Legislative Council Elections)

निवडून आलेले उमेदवार

भाजपा – पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत
शिवसेना – भावना गवळी आणि कृपाल तुमाने
राष्ट्रवादी – राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे
काँग्रेस – प्रज्ञा सातव
उबाठा गट – मिलिंद नार्वेकर (Legislative Council Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.