Legislative Council Elections : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धोका?

127
Legislative Council Elections : विधानसभेतही अपक्ष आणि पेट्यांवर चर्चा..
Legislative Council Elections : विधानसभेतही अपक्ष आणि पेट्यांवर चर्चा..

राज्यातील विधान परिषदेच्या (Legislative Council Elections) ११ जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत विधानसभेतील आमदार मतदान करणार असून पक्षीय बलाबल लक्षात घेता महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार सहज निवडून येतील. मात्र, महाविकास आघाडीने फाजील आत्मविश्वास दाखवत एक अतिरिक्त उमेदवार,उबाठाने (UBT), दिल्याने काँग्रेसच्या उमेदवाराला धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे. (Legislative Council Elections)

(हेही वाचा- अदानी प्रकरणात SEBIने हिंडेनबर्ग आणि नॅथन अँडरसन यांना पाठवली कारणे दाखवा नोटीस!)

फोडाफोडीच्या राजकारणाला प्रोत्साहन

विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार ११ पैकी महायुतीचे नऊ उमेदवार निवडून येऊ शकतात. यात भाजपाचे (BJP) पाच, शिवसेना (Shiv Sena) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन, तर महाविकास आघाडीचे दोन निवडून येऊ शकतात. महाविकास आघाडीतील दोनपैकी काँग्रेसची एक जागा सहजपणे निवडून येऊ शकते इतकी संख्या काँग्रेसकडे (Congress) आहे. शरद पवार गट आणि उबाठा गट स्वबळावर एकही उमेदवार निवडून आणू शकत नाही, पण तरी उबाठाने (UBT) तिसरा उमेदवार देऊन निवडणुकीत फोडाफोडीच्या राजकारणाला एकप्रकारे प्रोत्साहन देत आहे. (Legislative Council Elections)

शेकापला शरद पवार यांचा पाठींबा

महाविकास आघाडीतून काँग्रेसतर्फे दिवंगत काँग्रेस (Congress) नेते राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा यांना उमेदवारी दिली आहे तर शेकापचे जयंत पाटील यांना शरद पवार यांनी पाठींबा जाहीर केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातील सहकारी मिलिंद नार्वेकर यांनी महाविकास आघाडीकडून तिसरा अर्ज भरला असून त्यांची भिस्त उबाठाच्या  १६ व अन्य मतांवर असून अधिकाच्या जुळवाजुळव करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. (Legislative Council Elections)

(हेही वाचा- राज्यातील ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश; Deepak Kesarkar यांची माहिती)

महायुतीला धोका नाही

महायुतीमधील भाजपा (BJP), शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) यांचे संख्याबळ पाहता नऊ उमेदवार निवडून येण्यास काही अडचणी नाहीत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत (NCP) थोडी नाराजी असली तरी त्यापासून महायुतीला धोका नाही. उलटपक्षी, महाविकास आघाडीतील काँग्रेसची पुरेशी मते असूनही काही ‘अर्थ’ पूर्ण तडजोडी झाल्यास काँग्रेसची जागा धोक्यात येऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Legislative Council Elections)

उमेदवारी मागे घेण्यासाठी दोन दिवसांचा वेळ

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अद्याप दोन दिवस वेळ असून पुढील तीन दिवसांत कुणीही अर्ज मागे घेतला नाही तर मात्र १२ जुलैला निवडणूक होणे अटळ आहे. (Legislative Council Elections)

(हेही वाचा- Mumbai Riots : ९३च्या मुंबई दंगलीतील आरोपीला ३१ वर्षांनी अटक)

या निवडणुकीसाठी मंगळवार, २ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची मुदत होती. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी बुधवार, ३ जुलै, २०२४ रोजी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, ५ जुलै, २०२४ अशी आहे. १२ जुलै, २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होईल. तर त्याच दिवशी ५ वाजेनंतर मतमोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक १६ जुलै, २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. (Legislative Council Elections)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.