Legislative Council : शिवीगाळ करूनही दानवेंची माफी नाहीच!

97
Legislative Council : शिवीगाळ करूनही दानवेंची माफी नाहीच!

शिवसेना उबाठा नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात भाजपा आमदाराला शिवीगाळ केल्यापकरणी निलंबित करण्यात आले. मात्र, पाच दिवसाचे निलंबन शिक्षा कोणत्याही दिलगिरी शिवाय तीन दिवसांपर्यंत कमी करण्यात आली. शुक्रवारी ५ जुलैला दानवे यांनी सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला. (Legislative Council)

महिला उपसभापती समोर शिवीगाळ

दानवे यांनी १ जुलैला विधानपरिषद सभागृहात एका राजकीय विषयांवरील चर्चेदरम्यान भर सभागृहात भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांना आई-बहिणीचा उद्धार करीत शिवीगाळ केली. विशेष म्हणजे, त्यावेळी उपसभापती पदावर एक महिला उपस्थित असताना हा प्रकार सभागृहात घडला. यावरून दुसऱ्या दिवशी २ जुलैला दानवे यांना निलंबित करण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेतला गेला आणि दानवे यांच्या शिवीगाळप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागितली. त्यानुसार ३ जुलैला दानवे यांना ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याची घोषणा विधान परिषदेत झाली. (Legislative Council)

(हेही वाचा – Marine Drive ची रात्रभर स्वच्छता; तब्बल पाच जीप भर बुट, चप्पल झाले जमा)

किंतू परंतु नाही

४ जुलैला, गुरुवारी दानवे यांनी एक पत्र उपसभापती नीलम गोऱ्हे यांना लिहून निलंबन मागे घेण्याची विनंती केली. या पत्रात दानवे यांनी माफी तर मागितली नाही, तर केवळ ‘दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतू परंतु नाही’ असे त्यात नमूद केले. या आश्वासनानंतर भाजपाने निलंबन कालावधी ५ दिवसांवरून ३ दिवसंपर्यंत (१ ते ३ जुलै) कमी करण्याचा प्रस्ताव गुरुवारी सभागृहात मांडला आणि एकमताने मंजूर झाला. (Legislative Council)

दिलगिरी व्यक्त करण्याचे औदार्य नाही

शुक्रवारी दानवे सभागृहात आले आणि कामकाजात भाग घेतला. ‘म-भ’वरून सभागृहात शिव्या दिल्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी दर्शवणाऱ्या दानवे यांनी माफी तर नाहीच, साधी दिलगिरीही व्यक्त करण्याचे औदार्य दाखवले नाही, अशी चर्चा विधानभवन परिसरात होत आहे. (Legislative Council)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.