अर्णब गोस्वामींना विधिमंडळाचे फर्मान! अर्वाच्च भाषा वापरल्याने साक्ष नोंदवण्यासाठी हजर रहा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरल्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग सादर करण्यात आला होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणावरून रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीवर निवेदन करताना संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरली. या प्रकरणी विधिमंडळाने गोस्वामी यांना बुधवारी, ३ मार्च रोजी हक्कभंग समितीसमोर हजर राहून साक्ष नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांची देखील साक्ष या प्रकरणात नोंदवली जाणार आहे.

यापूर्वीही अर्णब गोस्वामी यांना हक्कभंग समितीने समन्स बजावले होते पण नोटीस बजावूनही ते गैरहजर राहिले. यामुळे पुन्हा एकदा समितीकडून गोस्वामी यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. सप्टेंबर 2020 मध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता, त्याच वेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनीही गोस्वामींवर कारवाईची मागणी केली होती. पुढे हिवाळी अधिवेशनातही अर्णब गोस्वामी यांच्या हक्कभंग प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पहायला मिळाली होती. दरम्यानच्या काळात गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत हक्कभंगाच्या प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामी यांना अटक केली जाऊ नये, असे आदेश दिले.

(हेही वाचा : ठाणे परिवहन विभागात घोटाळा! आयएएस अधिकाऱ्यासह १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल)

काय आहे हे प्रकरण?

  • सुशांत सिंग राजपूत प्रकरणात वार्तांकन करताना संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला होता.
  • तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची देखील अर्वाच्च भाषेत सूत्रसंचालन करत आव्हान देणारी भाषा वापरली होती.
  • त्यामुळे राज्य सरकारवर तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर अर्वाच्च भाषा वापरल्या कारणाने आमदार प्रताप सरनाईक यांनी संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
  • आमदार किंवा खासदार यांचा कोणी अपमान केला तर त्यांच्याविरोधात हक्कभंग केला जाऊ शकतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here