Legislature Special Session : राज्य विधिमंडळाचे शनिवारपासून विशेष अधिवेशन

२८८ आमदार घेणार विधानसभा सदस्यत्वाची शपथ

131
Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता
  • प्रतिनिधी

पंधरावी विधानसभा गठीत होऊन नव्या महायुती सरकारचा शपथविधी झाल्यानंतर राज्य विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन शनिवार (७ डिसेंबर) पासून सुरु होत आहे. या अधिवेशनात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या २८८ सदस्यांना शपथ दिली जाणार आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देतील. (Legislature Special Session)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी गुरुवारी आपल्या पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात पदभार स्वीकारताना मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत निवडून आलेल्या आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारकडून राज्यपालांना तशी शिफारस करण्यात आली. त्यानुसार शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून मुंबईत विशेष अधिवेशनाला सुरुवात होईल. (Legislature Special Session)

(हेही वाचा – आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांची ‘लाडकी कंपनी योजना’ रद्द करा; डॉ. राहुल घुले यांचे एकनाथ शिंदे यांना पत्र)

अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्य गीताने होईल. सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे शपथ घेतील. त्यानंतर सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य, महिला सदस्य या क्रमाने शपथविधी पार पडेल. पहिल्या दिवशी जास्तीत जास्त सदस्यांना शपथ देण्याचा प्रयत्न होणार आहे. तर दुसऱ्या उर्वरित सदस्यांना शपथ देऊन सदस्यांच्या शपथविधीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आमदार कोणत्या भाषेतून आणि कुणाला साक्ष ठेवून शपथ घेणार याची माहिती विधानमंडळ प्रशासनाने मागवली आहे. साधारणतः सदस्य मराठी, हिंदी, संस्कृत आणि प्रादेशिक बोलीभाषेतून शपथ घेतात. (Legislature Special Session)

७ आणि ८ डिसेंबर अशा दोन दिवसात आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे ९ डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष निवडला जाईल. या पदासाठी अगोदर निवडणूक कार्यक्रम घोषित केला जाईल. विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिभाषण होईल.आपल्या अभिभाषणातून राज्यपाल नव्या सरकारचे अभिनंदन करून सरकारला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतील. दरम्यान विधान परिषदेची बैठक ९ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती विधानमंडळ सचिवालयाने दिली आहे. (Legislature Special Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.