संसद टीव्हीप्रमाणे (Parliament TV) विधिमंडळ टीव्ही (Legislature TV ) सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. पुढील हिवाळी अधिवेशनापर्यंत ही टीव्ही वाहिनी सुरू होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. संसद टीव्ही ही भारतातील एक सरकारी दूरदर्शन वाहिनी आहे. ती संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कार्यक्रम आणि इतर सार्वजनिक घडामोडींचे कार्यक्रम प्रसारित करते. मार्च २०२१ मध्ये विद्यमान गृह वाहिन्या, लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही यांचे एकत्रीकरण करून त्याची स्थापना करण्यात आली. (Rahul Narvekar)
येणाऱ्या काळात विधान भवन परिसराचा विस्तार होणार
याच धर्तीवर विधिमंडळ टीव्ही नेटवर्क सुरू करणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. आजघडीला खासगी वाहिन्या विधिमंडळ कामकाजाचे प्रसारण करतात, पण विधिमंडळ टीव्ही सुरू झाल्यावर आम्ही त्यांना लाइव्ह फीड देऊ, असे ते म्हणाले. येणाऱ्या काळात विधान भवन परिसराचा विस्तार करण्यात येईल. विधिमंडळ परिसरात सेंट्रल हॅालची नितांत गरज आहे. मात्र विस्तारासाठी जागा कमी पडत आहे. भविष्यातील विस्तारासाठी सोयीस्कर जागा संपादित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर काम सुरू आहे. त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. त्यानंतर विधिमंडळ तसेच आजूबाजूच्या परिसरात विस्तार करण्यात येईल. गव्हर्नमेंट प्रेसची विधिमंडळाच्या नावे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशी माहिती नार्वेकरांनी दिली. (Rahul Narvekar)
नवनिर्वाचित आमदारांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करणार
हिवाळी अधिवेशनानंतर विधानभवन वर्षभर बंदच असते. येथे सुसज्ज वाचनालय तसेच प्रशिक्षणाच्या सुविधा आहेत. हे लक्षात घेता नवनिर्वाचित आमदारांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. यासाठी नवीन सदस्यांना सभागृहाच्या कामकाजाची ओळख व्हावी याकरिता एक कॅान्टिट्यूशन इन्स्टिट्यूट स्थापन करणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. या इन्स्टिट्यूटचा विस्तार कसा असेल. कामकाजाची ओळख नेमकी कशी करून दिली जाणार, याविषयी पुढील काळात पावले उचलली जाणार आहेत. (Rahul Narvekar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community