उद्यापासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत असून या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर राज्य सरकारची भूमिका मांडली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार घातला. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर खोचक टीका करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला होता.
विरोधकांचा चहापानावर सातत्याने बहिष्कार
यापूर्वी चहापानावर सातत्याने बहिष्कार घालण्यात आल्याचे पाहायला मिळाले नव्हते. मात्र दरवेळी कोणत्या न कोणत्या कारणांवरून बहिष्कार टाकण्याचे प्रकार घडायला नको. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पत्राद्वारे विरोधकांना चहापानाचे निमंत्रण दिले होते. असे असतानाही महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून ते काही ना काही मुद्दा काढून त्यावर बहिष्कार घालतात, असे म्हणत विरोधकावर निशाणा साधला.
(हेही वाचा – शिवसेना नेत्यांच्या विभागातीलच पदपथांचा प्रस्ताव ‘स्थायी’ने अडवला!)
आगामी अधिवेशन हे नागपुरात घेण्याबाबत सरकार सकारात्मक
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आगामी अधिवेशन हे सर्वांच्या मागणीनुसार नागपुरात घेण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल. सरकारच्या परंपरेप्रमाणे एक गोष्टी खरी आहे की, टीका टिप्पणी केली जात आहे अधिवेशन लहान आहे वैगरे परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, सध्या करोनाचं सावट आहे. आम्ही देशातील इतर राज्यांची देखील माहिती घेतली. पश्चिम बंगालला तर एक दिवसीय अधिवेशन झालं, काही ठिकाणी दोन, तीन, पाच दिवसीय अधिवेशन झालं. साधारण जी काही तिसरी लाट आहे, त्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भात बोललं जात आहे किंवा ओमायक्रॉनबाबत जी संपूर्ण जगात, देशात चर्चा सुरू आहे. त्याचा विचार करता जेवढी गर्दी कमी करता येईल, जितकं नियमांचं पालन करता येईल, त्या गोष्टी केल्या पाहिजेत.
तर पुढे ते असेही म्हणाले की, अधिवेशनात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, एसटी कर्मचारी संप, परीक्षा घोटाळा, कोविड धोका, वीज बिल आणि वीज तोडणी आदी मुद्दे उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यावर राज्य सरकारकडून योग्य आणि समाधारनकारक उत्तरं दिली जातील.