लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी संपली असून, काहीच दिवसात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadi) महायुतीच्या राजकीय नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. तसेच जागा वाटपासंदर्भातही चर्चा सुरू आहेत. मात्र, असं असलं तरी सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं चित्र आहे. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीपासूनच धुसफूस पाहायला मिळत आहे. (Prithviraj Chavan)
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांचा विजय झाला, तर उबाठा गटाचे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांचा पराभव झाला. यानंतर विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात आता काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Congress leader Prithviraj Chavan) यांनीही भाष्य करत अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला आहे. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली. यामध्ये विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील यांचा पराभव केला. यावरून आता पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं की, “जनसामान्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेविरूद्ध तिकीट देता कामा नये, हा धडा घेणं गरजेचं आहे”, असा टोला नाव न घेता पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. (Prithviraj Chavan)
(हेही वाचा – Maharashtra Sadan : नळाला नाही पाणी; केंद्रीय मंत्र्यांच्या अंघोळीसाठी मिनरल वॉटरचा वापर )
“मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात जी घटना घडली. त्याबद्दल निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. काहीतरी घडल्याशिवाय निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला का? दाखल झालेला एफआयआर हा सर्वांना दिला पाहिजे. तुम्ही ती माहिती गुप्त का ठेवली? आता मोबाईलवर पासवर्ड येतो आणि त्यातून ईव्हीएम उघडता येते? ही नवीन गोष्ट कोठून आली? आधी कोस्टल बॅलेटची मोजणी करून ती जाहीर करायला हवी. पण ते झालेलं दिसत नाही. त्यामुळे हा आरोप ईव्हीएमवर नाही तर मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघात झालेल्या प्रकाराबद्दल आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे या संदर्भातील मागणी करत आहोत. अर्थात आमची मागणी आहे की या सर्व प्रक्रियेवर लोकांचा विश्वास बसला पाहिजे”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. (Prithviraj Chavan)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community