गुढी पाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देतानाच महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी अशीच उंच आणि डौलाने उभारूया असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Eknath Shinde)
हेही वाचा-Gudhi Padwa 2025 : महाराष्ट्रातील पहिली गुढी तुळजाभवानी मातेच्या कळसावर उभारली !
गुढी पाडवा हा मराठी संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी घराघरांत उभारली जाणारी गुढी ही विजय, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. हा सण सामान्यांच्या जीवनात नवचैतन्य आणि नवीन ऊर्जा घेऊन येवो. सर्वांना समृद्धी आणि यश प्राप्त होवो उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. (Eknath Shinde)
हेही वाचा- “विकासाची महागुढी उभारू या…” ; CM Devendra Fadnavis यांच्याकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
महाराष्ट्र प्रगतीशील राज्य असून नवनव्या संधीना गवसणी घालण्याची राज्याची क्षमता आहे. अशा संधी शोधूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी उंच आणि आणखी डौलाने उभारूया. नववर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात चैतन्याचे पर्व घेऊन येते. नववर्षाच्या उत्साही क्षणांतून आपल्याला नवनिर्मितीची प्रेरणा मिळते. ही प्रेरणा घेऊन आपला महाराष्ट्र कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा, अशी मनोकामना व्यक्त करतानाच नववर्षाचे स्वागत करताना पर्यावरणाचे भान बाळगण्याचे, आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचे आणि पाणी, हवा यांचे प्रदूषण रोखण्याची जागरुकता निर्माण करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. (Eknath Shinde)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community