१०० कोटी वसुली प्रकरणी खोटे कोण बोलत आहे ते समोर येण्यासाठी माझी आणि तुमची नार्को टेस्ट करूया, असे आव्हान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले. ते खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
महाविकास आघाडीची सत्ता असताना परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर चार दिवसांपासून अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंह, सचिन वाझे यांच्यावर आरोप केले आहेत. मनसुख हिरेन यांच्या खून प्रकरणात परमबीर सिंह (Parambir Singh) यांना अटक होणार होती. त्यामुळे ते फडणवीस यांना शरण गेले आणि माझ्यावर आरोप केले, असे अनिल देशमुख यांनी म्हटले होते. तसेच सचिन वाझे दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते की, अनिल देशमुख यांनी सांगितल्यानंतर ते वसुली करत होते.
(हेही वाचा – Share Market Mayhem : अमेरिकेत मंदीच्या भीतीने भारतीय बाजारही ३ टक्क्यांनी घसरले)
कुंदन शिंदे मार्फत अनिल देशमुख यांच्यापर्यंत पैसे पोहचवले जात होते. त्या आरोपावर बोलताना परमबीर सिंह (Parambir Singh) म्हणाले की, सचिन वाझे आणि इतर अधिकाऱ्यांनी मला हा सर्व प्रकार सांगितला होता. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना पत्र लिहिले. हे पत्र लिहिण्यापूर्वी मी मुख्यमंत्री, शरद पवार, जयंत पाटील यांना ही माहिती दिली होती. मात्र त्यांनी दखल घेतली नाही. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रकरणाची चौकशी झाली. त्या चौकशीत अनिल देशमुख दोषी आढळले. त्यानंतर ते कारागृहात गेले.
परमबीर सिंग (Parambir Singh) पुढे म्हणाले, अनिल देशमुख यांनी जे आरोप केले आहेत, त्यासंदर्भात त्यांनी त्यावेळी माझी चौकशी का केली नाही? माझ्यावर कारवाई का केली नाही? माझी तीन वेळा एनआयएकडे चौकशी झाली. त्या चौकशीत काहीच आढळले नाही. त्यामुळे आता आपण दोघेही नार्के टेस्ट करु या, असे आव्हान परमबीर सिंह यांनी दिले. सचिन वाझे पुन्हा पोलीस दलात अनिल देशमुख यांच्या आदेशानंतरच आले होते, असेही त्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community