शपथविधीनंतर पाहू; Amit Shah आणि Devendra Fadnavis यांच्या चर्चेत काय झाले ?

भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांनी याबाबत 'तुमचे काम सुरु ठेवा, शपथविधीनंतर सविस्तर बैठक होईल', असे देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) म्हटले आहे.

184
शपथविधीनंतर पाहू; Amit Shah आणि Devendra Fadnavis यांच्या चर्चेत काय झाले ?
शपथविधीनंतर पाहू; Amit Shah आणि Devendra Fadnavis यांच्या चर्चेत काय झाले ?

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) भाजप महायुतीला महाराष्ट्रात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे महायुतीचे सर्वच नेते निराश झाले असून पुढील विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखण्यासंदर्भात ते बोलत आहेत.अशा स्थितीत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली. याच पत्रकार परिषदेत वरिष्ठांनी मला सरकारच्या जबाबदारीतून दूर करावे, अशी विनंती केली होती.

(हेही वाचा – Mhada Home Mumbai: मुंबईकरांनो स्वत:च्या हक्काचं घर घेण्याची इच्छा पूर्ण होणार, म्हाडाने उभारली ३६०० घरे, जाणून घ्या नेमके ठिकाण कुठले? )

शपथविधीनंतर सविस्तर बैठक होईल

फडणवीसांच्या या विधानानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहेत. भाजपच्या (BJP) नेत्यांनीही फडणवीसांच्या या निर्णयाला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठी अमित शाह यांची भेट घेतली आहे. या वेळी झालेल्या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांनी याबाबत ‘तुमचे काम सुरु ठेवा, शपथविधीनंतर सविस्तर बैठक होईल’, असे देवेंद्र फडणवीसांना म्हटले आहे.

दोन वेळा घेतली अमित शाहांची भेट

देवेंद्र फडणवीस यांनी ६ जूनच्या रात्री आणि ७ जूनच्या दुपारी अशा दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे कालची अपूर्ण चर्चा आजच्या दुसर्‍या भेटीत पूर्ण झाल्याचे समजते. फडणवीस यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, सध्या तुम्ही तुमचे काम सुरु ठेवा. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ. महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा आराखडा तयार करू. पण, तोवर तुम्ही आपले काम सुरू ठेवा.

दिल्लीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक

राजधानी दिल्लीत आज भाजपप्रणित एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वच घटकपक्षांनी मोदींच्या नेतेपदाला पाठिंबा दिला. येथील बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या बंगल्यावर महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील पराभवाच्या अनुषंगाने व पुढील मंत्रीमंडळ विस्ताराच्या विषयावर चर्चा झाली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.