कांदा उत्पादक शेतकऱ्याला २ रुपयांचा चेक देणाऱ्या ट्रेडर्सचा परवाना रद्द; फडणवीसांची माहिती

149

५१२ किलो कांदा विकल्यानंतर २ रुपयांचा चेक मिळालेल्या सोलापुराच्या कांदा उत्पादक शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांपुढे व्यथा मांडली होती. याबाबतची माहिती अजित पवारांनी रविवारी झालेल्या मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली. याच प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारने तातडीने कारवाई करत, कांदा उत्पादक शेतकऱ्याला २ रुपयांचा चेक देणाऱ्या ट्रेडर्सचा परवाना रद्द केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

सोमवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कांदा उत्पादक शेतकरी राजेंद्र चव्हाण यांना २ रुपयांचा चेक कसा मिळाला याशिवाय स्पष्टीकरण दिले.

फडणवीस म्हणाले की, ‘कांदा उत्पादक शेतकरी राजेंद्र चव्हाणांनी ५१२ किलो कांदा विकायला आणला होता. छोटा आणि कमी प्रतीच्या कांद्याचा भाव १०० ते १५० रुपये असतो, तर चांगल्या आणि मोठ्या प्रतीच्या कांद्याचा भाव ५०० ते १४०० रुपये असतो. राजेंद्र यांना ५१२ रुपये मिळाले, पण त्यांना जो चेक मिळाला तो २ रुपयांचा मिळाला. सिस्टिमनुसार, त्यांच्या चेकमधून वाहतुकीचा खर्च कापण्यात आला आहे. पण कमी प्रतीचा कांदा असतो, त्यातून वाहतुकीचा खर्च कापता येत नाही. याबाबत २०१४ साली नियम करण्यात आला आहे. याप्रकरणी आता संबंधित सूर्या ट्रेडर्सचा परवाना रद्द करण्यात आला आहे.’

(हेही वाचा – वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.