लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित सैन्याधिकारी, देशसेवेबाबत त्यांचा अभिमान! प्रसाद लाड यांची भूमिका 

147

लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित हे माझे मित्र आहेत. ते देशसेवेत सध्या रूजू झाले आहे. पुरोहित सैन्यदलाची सेवा करत आहेत, त्याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे, अशी भूमिका भाजपचे आमदार प्रसाद पुरोहित यांनी मांडली.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये एक व्हिडिओ दिसत आहे. हा व्हिडिओ प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नाचा आहे. त्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी त्यांना मालेगाव बाँबस्फोटातील संशयित कर्नल प्रसाद पुरोहित यांनी हस्तांदोलन केले. त्यावेळीची व्हिडिओ क्लिप सचिन सावंत यांनी ट्विट करत ‘बहुत याराना लगता है’, असे म्हटले.

हिंदू दहशतवाद संकल्पना रुजवण्यासाठी खोटे गुन्हे 

त्यावर भाजपचे आमदार प्रसाद लाड माध्यमांशी बोलताना म्हणाले की, कर्नल प्रसाद पुरोहित हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा गुन्हा दाखल आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यांना अजून दोषी ठरवण्यात आले नाही. सध्या ते सैन्यात पुन्हा रुजू झाले आहेत. सैन्यामध्ये गुप्तहेर खात्यात पुन्हा आपली सेवा देत आहे. देशसेवेत स्वतःचे जीवन समर्पित करणारे सैन्य अधिकारी हे केव्हाही सन्माननीय असतात. त्यामुळे त्यांचा मला अभिमान आहे, असे प्रसाद लाड म्हणाले. मालेगाव बॉम्बस्फोटात हिंदू दहशतवाद ही संकल्पना रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते, जे आता समोर येत आहे, असेही प्रसाद लाड म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.