आदित्य ठाकरेंची बडबड गीते, ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा

102

मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार छत्री असून देखील पावसात भिजले. एखादी गोष्ट उपलब्ध असताना मुद्दामून ती नाकारणे आणि त्या गोष्टीची बातमी बनवणे व काही लोक त्यावर भुलणे ही गोष्ट खरोखरच विचित्र आहे. आपण आज आधुनिक युगात जगतोय तरी अशा गोष्टी आपल्या आवडत असतील तर आपली सामाजिक मानसिकता अजूनही प्रौढ झालेली नाही असे म्हणावे लागेल.

( हेही वाचा : सरकार आणणार ‘Right to Repair’ कायदा; जुन्या Electronic वस्तू दुरूस्त करून देणं कंपनीला बंधनकारक )

शरद पवार पावसात भिजले आणि मीडियावर ही एकच बातमी सारखी सारखी झळकत होती. छत्री नसती आणि भिजले असते तर ही क्रूती स्वाभाविक झाली असती. पण छत्री नाकारुन त्यांनी हे दाखवून दिलं की लोकांना मूर्ख बनवणे खूप सोपं आहे. कदाचित त्यांच्या भिजण्यामुळे त्यांना काही अधिक मते मिळाली असतील. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत व वयाने वृद्ध आहेत. त्यामुळे वृद्ध माणसाने भिजून भाषण केलं तर ती बातमी होऊ शकते, यातून काही लोकांची सहानुभूती मिळू शकते.

एवढी मोठी जबाबदारी का सोपवली असेल?

पण आदित्य ठाकरे छत्री असून पावसात भिजले ही बातमी देताना पत्रकारांनी काहीतरी लाज बाळगायला नको का? आदित्य ठाकरे केवळ ३२ वर्षांचे आहेत. खरं पाहता पावसात भिजण्याचं त्यांचं वय आहे. तरुणांना पावसात भिजायला आवडतं. यात जर कुणाला बातमी दिसत असेल तर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमाणे त्या पत्रकाराला कदाचित देखील आदित्य ठाकरे हे ’एवढसं मूल’ वाटत असतील. आता एवढंसं मूल पावसात भिजून भाषण करत असेल तर कुणालाही कौतुक वाटू शकतं.

आता या एवढ्याशा मुलाला असं का वाटलं असेल की ज्याप्रमाणे शरद पवारांनी पावसात भिजून सहानुभूती मिळवली त्याप्रमाणे आपल्यालाही सहानुभूती मिळेल? हा संशोधनाचा मुद्दा आहे. मग आदित्य जर एवढसं मूल असेल तर त्यांच्या बाबांनी त्यांच्यावर एवढी मोठी जबाबदारी का सोपवली असेल? आणि हे एवढसं मूल अडीच वर्षे महाराष्ट्राचं मंत्री होतं. मग जनतेच्या खांद्यावर या एवढ्याशा मुलाला बसवण्यात काय अर्थ होता? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होऊ शकतात.

’ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा’

आदित्य ठाकरे मराठी अस्मिता जपणार्‍याच्या घरी जन्मले असले तरी त्यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे असं म्हटलं जातं. ते शाळेत रेन रेन गो अवे हे बडबडगीत शिकले असणार. त्यांना विठ्ठलाच्या मंदिरातील आरतीच्या धुराने देखील त्रास होतो. इतकं असूनही आज आदित्य ठाकरे पावसात भिजत ’ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा’ हे गीत म्हणत आहेत. रेन रेन गो अवे ही त्यांची खरी संस्कृती असली, ’तरी ये रे ये रे पावसा’ मध्ये ’तुला देतो पैसा’ ही ओळ अत्यंत महत्वाची आहे आणि आता काही महिन्यांत भारातातील सर्वात श्रीमंत पालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.