सरकारने केवळ हिंदूंच्या मंदिरांवर नियंत्रण ठेवू नये, तर चर्च आणि मशीद यांवरही नियंत्रण ठेवावे. त्यासाठी कायदा करावा, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेने (VHP) केली आहे. विहिंपचे केंद्रीय संघटनेचे सरचिटणीस मिलिंद परांडे आणि अन्य पदाधिकारी यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांची भेट घेऊन त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली.
(हेही वाचा Bangladeshi Infiltrators : जुन्नरमधून बांगलादेशी माय-लेक ताब्यात; पतीचा शोध सुरू)
राज्यघटना सर्व धर्मांना समान मानते. जर मशिदी आणि चर्च सरकारी नियंत्रणाबाहेर राहू शकतात, तर मंदिरांच्या संदर्भात भेदभाव का केला जातो? हे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असून समानतेच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. ही एक असमान आणि अन्याय्य व्यवस्था आहे, जी लवकरात लवकर काढून टाकली पाहिजे. सरकारने ही व्यवस्था लवकरात लवकर पालटावी, अशी आमची इच्छा आहे. सर्व धर्मांना समान अधिकार मिळाले पाहिजेत. या प्रकरणी सरकारने कायदा करावा, अशी विहिंपची (VHP) इच्छा आहे.
Join Our WhatsApp Community