उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज बुधवारी आपल्या 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, नितीन गडकरी, स्मृती इराणी आणि मुख्तार अब्बास नकवी यांचा समावेश आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाचा सहभाग
त्यासोबतच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद यादव, दिनेश शर्मा, प्रदेश भाजपा अध्यक्ष स्वतंत्रदेवसिंह, उत्तरप्रदेश भाजपाचे प्रभारी राधामोहनसिंह, निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांचाही या यादीत आहे. याशिवाय खासदार हेमामालिनी, संजीव बाल्यान, जसवंत सैनी, अशोक कटारिया, सुरेंद्र नागर, चौधरी भूपेंद्रसिंह, बी. एल. वर्मा, राजवीरसिंह, एसपीसिंह बघेल, साध्वी निरंजना ज्योती, कांता कदम, रजनीकांत माहेश्वरी, मोहित बेनीवाल, धर्मेंद्र कश्यप, जेपीएस राठोड आणि भोलासिंह खटिक यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
(हेही वाचा – राज्यात शाळा, महाविद्यालयं सोमवारपासून होणार सुरू?)
कोणाला वगळले
शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आलेले गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे नाव मात्र यादीत नाही. अजयकुमार मिश्रा यांच्या मुलावर लखीमपूर खिरी येथे शेतकरी आंदोलकांवर जीप चालवल्याचा आरोप आहे. त्यामुळे मिश्रा यांना प्रचारापासून लांब ठेवल्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community