लोकसभा सचिवालयाकडून असंसदीय शब्दांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गद्दार, शकुनी, जयचंद, भ्रष्ट यासह अनेक शब्द वापरण्यावर आता कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. लोकसभा सचिवालयाच्या निर्णयावर विरोधी पक्षातील नेत्यांनी मात्र आक्षेप घेतला आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 18 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्याआधीच असंसदीय शब्दांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. सरकारला धारेवर धरताना काही शब्दांचा वापर केला जातो, पण त्या शब्दांवर निर्बंध आणले गेल्याने विरोधी पक्षांकडून आता टिका केली जात आहे.
( हेही वाचा: मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिली? न्यायालयाचे चौकशीचे आदेश )
‘हे’ शब्द वापरण्यावर निर्बंध
हरामी, काळे सत्र, दलाल, खून की खेती, नौटंकी, खलिस्तानी, हुकूमशाही, हुकूमशहा, अराजकतावादी , देशद्रोही , बदनामी , गिरगिट, काळा दिवस, काळाबाजार , घोडेबाजार , संवेदनाहीन, जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, बाल बुद्धी, शर्म, दुर्व्यवहार, विश्वासघात, ड्रामा, पाखंड, अक्षम, शकुनी, लाॅलीपाॅप, चांडाल, गुल खिलाए, पिट्टू, कोयला चोर, गोरु चोर, चरस पीते हैं, सांड, विनाश पुरुष, अपमान, गूंस, घडियाली आंसू, असत्य, अंहकार, खरीद फरोख्त, दादागीरी, बेचारा, लैंगिक छळ यासारखे शब्ददेखील या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत.
‘या’ वाक्यांवरही निर्बंध
लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती तसेच पीठासीन अधिका-यांना उद्देशून काही शब्दांवर आणि वाक्यांवरदेखील निर्बंध घालण्यात आले आहेत. यात “आपण माझा वेळ वाया घालवत आहात”, “तुम्ही आमचा गळा दाबून टाका”, “खुर्चीला कमजोर केले आहे”, “ही खुर्ची सदस्यांचे संरक्षण करु शकत नाही”, अशा वाक्यांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community