केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ : आयकर आकारणीत काहीही  बदल नाही! 

184

मोदी सरकारच्या दुस-या टर्ममध्ये कोरोना संकटात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडत आहेत. 1 फेब्रुवारीला हा अर्थसंकल्प पटलावर ठेवण्यात आला. यंदाचा हा अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल आहे. अर्थसंकल्पाच्या मोजक्याच प्रती छापण्यात आल्या. कररचनेत कोणतेही बदल न करण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी जाहीर केला आहे. यासोबतच, इतरही करांबाबत अर्थमंत्र्यांनी केंद्र सरकारचं या वर्षभराचं धोरण यावेळी जाहीर केलं. सलग सहाव्या वर्षी कररचनेत कोणताही बदल न करण्यात आल्यामुळे सामान्य करदात्यांच्या पदरी निराशाच आल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

  • ९.०२ टक्के देशाचा विकासदर असेल
  • कोरोनाच्या महामारीतही अर्थ व्यवस्था सुरळीत ठेवली
  • आझादीचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे
  • मात्र पुढील २५ वर्षे अधिक प्रगतीचे असतील
  • मायक्रो इकॉनॉमिक वाढवणे, डिजिटल टेक्नॉलॉजी वाढवणे हे आपले ध्येय आहे
  • घर, गॅस, पाणी गरिबांना देत आहोत, त्यांच्या खात्यात थेट रक्कम देत आहोत
  • वर्षभरात २५ हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बांधले
  • २०२२-२३ – ४ लॉजिस्टिक पार्क उभारणार
  • २०२२-२३ ४ लॉजिस्टिक पार्क उभारणार
  • ४०० वंदे भारत ट्रेन ३ वर्षांत बांधणार
  • पीएम गतीशक्ती योजनेद्वारे एक्स्प्रेस हायवे विकसित करण्याचे ध्येय
  • या योजनेसाठी 25 हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित
  • वाहतूक आणि दळवळण वेगवान होणार
  • यामुळं प्रवासाचा वेळ कमी होणार
  • इंधनाचा खर्च कमी वाचणार
  • एलआयसीचा आयपीओ लवकरच येणार
  • गती शक्ती योजनेद्वारे पायाभूत सोयी सुविधांचा विकास
  • सबका साथ सबका विकास आणि सबका कल्याण हे सरकारचं धोरण
  • 30 लाख नोकऱ्या निर्माण करण्यासाठी प्रयत्न
  • बँकाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहोत
  • मेट्रो मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी उभारणार
  • पर्वत माला – खडतर भागात रस्ते बांधले जाणार, त्यातून पर्यटनाला प्रोत्साहन त्यासाठी ८ रोप वे बांधणार
  • किसान ड्रोन ला प्रोत्साहन देणार
  • कृषी विद्यापीठांसाठी राज्यांना प्रोत्साहन देणार नाबार्डमधून त्यांना साहाय्य करू
  • ६२ लाख लोकांना पाणी पुरवणार
  • २२ लाख मेगा वॉट सोलर एनर्जी निर्माण
  • ५ नद्या जोडणार
  • २०० टी व्ही चॅनल निर्माण कारणार १ ली ते १२ वी पर्यंत शिक्षण देणार सर्व प्रादेशिक भाषेत शिकवणार
  • डिजिटल युनिव्हर्सिटी निर्माण करणार, नेटवर्क हब मॉडेल म्हणून त्या ओळखल्या जातील
  • वन स्टेशन वन प्रोडक्ट योजना आणणार
  • छोट्या शहरात काम करणाऱ्या उद्योजकांना याचा लाभ होणार आहे
  • पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार
  • रेल्वेचं जाळं विकसित करणार
  • मेट्रोच्या विकासासाठी प्रयत्न करणार
  • मेट्रोचं जाळं प्राधान्यानं विकसित करणार
  • 2022-2023 मध्ये आठ ठिकाणी रोप वे सुरु करणार
  • रस्ते विकासासाठी पीपीपी मॉडेल वापरणार
  • १.५ लाख टपाल कार्यालये डिजिटल होणार बँकिंग सिस्टीम एकमेकांना जोडणार
  • कोरोनाकाळात मानसिक समस्या वाढल्याने देशात 21 मानसिक समस्या समुपदेशन केंद्र सुरु करणार
  • 48 हजार कोटी रुपये पीएम आवास योजनेसाठी मंजूर
  • पंतप्रधान विकास योजना उत्तर पूर्व ही  नवी योजना जाहीर
  • 1500 कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आलीय
  • देशातील मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी काम
  • 112 जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न
  • विलेज इन्फ्रास्ट्रक्चर योजना सुरु
  • 2022-23 मध्ये सार्वजनिक गुंतवणूक, पीपीपीच्या क्षमतेची आर्थिक विकासासाठी गरज
  • भाडवली खर्च 35 टक्क्यांनी वाढणार
  • जीडीपीमध्ये 2.9 टक्के वाढ दिसून येईल
  • ग्रीन बाँडस आणले जाणार
  • हरित विकासासाठी हे पाऊल टाकणार
  • सेंट्रल बँक डिजीटल करन्सीची स्थापना करणार
  • यामुळं डिजीटल करन्सीला प्रोत्साहन देणार
  • रिझर्व्ह बँक डिजीटल रुपी जारी करणार
  • राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा
  • 1 लाख ४० कोटी इतका जीएसटी जमा झाला
  • स्टार्ट अपसाठी २०२३ पर्यंत करसवलत
  • पेन्शममधून मिळणारे उत्पन्न करमुक्त असणार
  • इन्कम tax मध्ये कोणताही बदल नाही
  • दागिण्यांवरील ४ टक्के कर कमी
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.