आज म्हणजेच रविवार ३१ मार्च रोजी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani Bharat Ratna) यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला. यावेळी उपराष्ट्रपती यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देखील उपस्थित होते.
(हेही वाचा – #ClickHere हा प्रकार नक्की आहे तरी काय? जाणून घ्या)
या औपचारिक समारंभाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि अडवाणींचे कुटुंबीय उपस्थित होते.
.
.
.#ClickHere #GhazipurDM #Rajputs_Boycott_Bjp #BharatRatna #stylesquad #DroupadiMurmu #LalKrishnaAdvani #PMModi pic.twitter.com/xkJ2OunYDf— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) March 31, 2024
राममंदिराच्या उभारणीसाठी रथयात्रा :
१९८० च्या दशकाच्या सुरुवातीला, विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतील राम जन्मभूमीच्या ठिकाणी मंदिर बांधण्यासाठी चळवळ सुरू केली. अडवाणी (LK Advani Bharat Ratna) यांच्या नेतृत्वाखाली भाजपा हा राम मंदिर चळवळीचा चेहरा बनला. अडवाणी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबर १९९० रोजी सोमनाथ येथून राम रथयात्रा सुरू केली होती. (LK Advani Bharat Ratna)
(हेही वाचा – K D Singh ED : टीएमसीच्या माजी खासदारावर ईडीची मोठी कारवाई; ३ राज्यांतील मालमत्ता जप्त)
मरणोत्तर भारतरत्न :
तसेच माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि चौधरी चरण सिंग, कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन आणि दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिलेल्या कर्पूरी ठाकूर यांना राष्ट्रपती यांच्या हातून मरणोत्तर भारतरत्न (LK Advani Bharat Ratna) हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे पुत्र पी. व्ही. प्रभाकर राव यांनी त्यांच्या वडिलांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. चौधरी चरण सिंग यांच्यासाठी, त्यांचे नातू आणि राष्ट्रीय लोक दलाचे (आरएलडी) अध्यक्ष जयंत चौधरी यांनी राष्ट्रपतींकडून हा पुरस्कार स्वीकारला. स्वामीनाथन यांच्या वतीने त्यांची कन्या नित्या राव तर कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. (LK Advani Bharat Ratna)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community