लॉकडाऊनच्या काळात सरकारला तारले दारूने! तिजोरीत १५,०९० कोटी जमा! 

राज्य सरकारने २०२०-२१ या वर्षातील अर्थसंकल्पात मद्यविक्रीतून १५,५०० कोटी रुपये महसूल जमा करण्याचे लक्ष्य ठेवले होते.

91

मागील वर्षभरापासून राज्यात कोरोनाचा संसर्ग सुरु आहे. म्हणून तेव्हापासून राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सुरुवातीचे ८-९ महिने हॉटेल, बार रेस्टारंट बंद होते, परंतु दारूची घरपोच पार्सल सुविधा सुरुच होती. त्यामुळे सरकारने मद्यविक्रीतून वर्षभरासाठी जेवढा महसूल अपेक्षित ठरवला होता, तेवढ्याच प्रमाणात तो सरकारी तिजोरीत जमा झाला. २०२०-२१ या वर्षात राज्याच्या तिजोरीत मद्यविक्रीतून १५ हजार ०९० कोटी रुपये महसूल जमा झाला.

सरकारला दारूचा आधार!

राज्य सरकारने २०२०-२१ या वर्षातील अर्थसंकल्पात मद्यविक्रीतून १५,५०० कोटी रुपये महसूल जमा करण्याचे लक्ष्य ठेवले होते, त्या तुलनेत ८ महिने लॉकडाऊन असूनही सरकारने ठरवलेले लक्ष्य बऱ्याच अंशी साध्य केले आहे. लॉकडाऊनच्या काळातही महसूल जमा करण्यासाठी हा एकमेव प्रभावी मार्ग असल्याने सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही जेव्हा लॉकडाऊन लावला आहे, अशा वेळी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवल्या असल्या, तरी दारू मात्र घरपोच पोचवण्याची सुविधा सुरूच ठेवली आहे. म्हणून सरकारच्या तिजोरीत लॉकडाऊनमध्येही भर पडत आहे.

(हेही वाचा : कोरोनासोबतच अफवांचीही पसरतेय लाट… असा पोखरतोय व्हायरल मेसेजचा ‘व्हायरस’! तथ्यं आले समोर)

यंदाही सरकारला दारूच तारणार!

२०१८-२०१९ या वर्षात राज्य सरकारने मद्य विक्रीतून १५,३२३ कोटी रुपये महसूल जमा केला होता. तर २०१९-२०२० या वर्षात १७ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा केला होता. त्या तुलनेत राज्याने २०२०-२१ या वर्षात १५ हजार ०५० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. लॉकडाऊनच्या काळातही सरकारने इतका महसूल जमा करण्याची किमया अवगत केली आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन जाहीर झाला आहे. पहिल्या टप्प्यातील हा लॉकडाऊन १० दिवसांचा आहे, त्यानंतरही हा लॉकडाऊन वाढवण्याच्या विचारात सरकार आहे, असे समजते. त्यामुळे या वेळीही सरकारला दारूचं तारणार का, हे पहावे लागेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.