Lok Sabha 2024 : मोदी-भागवत सुप्त संघर्षाचा भाजपाला फटका

लोकसभा निवडणुकीत भाजपाला किमान ३७० आणि ‘एनडीए’ला ४०० पार जागा मिळतील, असे लक्ष्य भाजपाचे होते मात्र भाजपा २४० च्या वर जाऊ शकले नाही तर ‘एनडीए’ ३०० पार करू शकले नाही.

240
काँग्रेसच्या आरोपांना BJP चे सडेतोड उत्तर

देशभरात भाजपाला लोकसभा २०२४ निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जवळपास १३० जागा कमी मिळाल्या. याच्या प्रमुख कारणांमध्ये जसे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण झाल्याची शक्यता आहे तसेच भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) निवडणुकीतून अंग काढून घेतल्याची चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध ‘आरएसएस’चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यातील सुप्त संघर्ष भाजपाच्या जागा घसरणीला जबाबदार असल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. (Lok Sabha 2024)

लोकसभा निवडणुकीत भाजपाला किमान ३७० आणि ‘एनडीए’ला ४०० पार जागा मिळतील, असे लक्ष्य भाजपाचे होते मात्र भाजपा २४० च्या वर जाऊ शकले नाही तर ‘एनडीए’ ३०० पार करू शकले नाही. (Lok Sabha 2024)

‘आरएसएस’चे समर्थन नाही 

शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी गुरुवारी ६ जून रोजी सकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत थेट आरोप करताना म्हटले की, “नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तरी त्यांना ‘आरएसएस’चे समर्थन मिळणार नाही असे मला वाटते. याचे कारण मोदी आणि अमित शहा यांनी सत्तेत असतानाही आरएसएस’ला संपवण्याचा प्रयत्न केला, संघाचे महत्व कमी करण्याचे काम केले आणि हे सगळं आमच्यासमोर झाले आहे,” असे राऊत म्हणाले. (Lok Sabha 2024)

(हेही वाचा – Pothole : यंदा खड्डा भरताना महापालिका काय घेणार काळजी, जाणून घ्या!)

योगींना हटवण्याचे प्रयत्न

“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पदावरून हटवण्याचे प्रयत्न काही लोक करीत आहेत, अशा आमच्या भावना आहेत. हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय असला तरी आम्ही सगळेच योगी यांना प्रमाण करतो, यांचा आदर करतो,” असे राऊत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. (Lok Sabha 2024)

संस्था संपवण्याचे कार्य

राऊत पुढे म्हणाले की, “सर्वच संस्था संपवण्याचे कार्य, मग त्या राजकीय असो किंवा संविधानिक, संपवण्याचे काम मोदी यांनी केले,”२०१९ मध्ये हे उघडपणे बोलणारे चंद्राबाबू नायडू हेच होते. त्यांनी संस्थाबाबतच नाही तर निवडणूक आयोग ‘ईव्हीएम’मध्ये छेडछाड करून आम्हाला हरवण्याचे षडयंत्र करत आहे आणि त्यामागे मोदी आणि शहा आहेत असेही नायडू म्हणले होते. आणि आज तेच चंद्राबाबू मोदींसोबत आहेत आमच्या त्यांना शुभकामना आहेत.” (Lok Sabha 2024)

‘पिक्चर अभी शुरू, एंड बाकी..’

संघाकडून नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह हेसुद्धा पंतप्रधान पदासाठी पर्याय असू शकतात, अशी चर्चा आहे, असे विचारले असता राऊत म्हणाले, “वेट अँड वॉच. मी काल पण सांगितले ‘देखते रहिये, आगे आगे क्या होता है’. पुढे अजून बरेच काही होणार आहे. मी तर असं म्हणेन ‘पिक्चर अभी शुरू हुआ है, एंड अभी बाकी है’.” (Lok Sabha 2024)

एकूणच संघाने या लोकसभा निवडणुकीत काही काम न करता शांत राहावे, असे मुख्यालयातूनच सांगण्यात आले होते. परिणामी, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांत झाला, अशी चर्चा संघाच्या विविध शाखा आणि संघटना पदाधिकाऱ्यांमद्धे होत आहे. (Lok Sabha 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.