Lok Sabha Election 2024: ठाण्यात मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम

महापालिका आयुक्त यांनीदेखील या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन मतदान करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले.

189
PUNE: घरून मतदान करणाऱ्यांसाठी मंगळवारी अर्ज नोंदणीचा शेवटचा दिवस, काय आहेत आयोगाचे आदेश?
PUNE: घरून मतदान करणाऱ्यांसाठी मंगळवारी अर्ज नोंदणीचा शेवटचा दिवस, काय आहेत आयोगाचे आदेश?

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) किसननगर शाळा क्र. 23 मध्ये मी मतदानाचा हक्क बजावणार, असा फलक लावण्यात आला असून त्यादवारे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनीदेखील या फलकावर स्वाक्षरी करुन या मोहिमेत सहभाग घेतला तसेच उपस्थितांना मतदान करण्याचा संदेश दिला. (Lok Sabha Election 2024)

या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, तसेच महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांनीही स्वाक्षरी करून आपला सहभाग नोंदविला.

(हेही वाचा –Country’s First Air Taxi: प्रदूषणापासून दिलासा देणाऱ्या पहिल्या हवाई टॅक्सीची होणार निर्मिती, काय आहेत वैशिष्ट्य? जाणून घ्या… )

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सभागत वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदार जागृती व्हावी यासाठी ठामपा शाळा क्र. 23 मध्ये स्वाक्षरी मोहिम फलक लावण्यात आला असून शाळेत येणारे शिक्षक, पालक मतदानाचा हक्क बजावणार असल्याबाबत फलकावर स्वाक्षरी करीत आहेत. महापालिका आयुक्त यांनीदेखील या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन मतदान करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.